राज्यासाठी समाधानकारक आकडेवारी; १० कोटी लसीकरणाचा टप्पा केला पार


हायलाइट्स:

  • महाराष्ट्रासाठी आणखी एक समाधानकारक आकडेवारी
  • १० कोटी लसीकरणाचा टप्पा ओलांडला
  • आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलं करोनायोद्धांचे अभिनंदन

मुंबई : करोनाची दुसरी लाट ओसरत असताना महाराष्ट्रासाठी आणखी एक समाधानाची बाब समोर आली आहे. ‘राज्याने आज दुपारी ४ वाजता महाराष्ट्राने १० कोटी लसीकरणाचा टप्पा ओलांडला,’ अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

करोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेने देशभरातील इतर राज्यांप्रमाणे महाराष्ट्रातही धुमाकूळ घातला. अनेकांना या आजाराची लागण झाली तर काहींनी या आजारात आपला जीवही गमावला. करोना प्रतिबंधक लस शोधण्यात यश आल्यानंतर या रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने युद्धपातळीवर लसीकरण्यास सुरुवात केली. या लसीकरणात राज्याने मोठी आघाडी घेतली असून आता १० कोटी लसीकरणाचा आकडा पूर्ण केला आहे.

coronavirus latest updates करोना: राज्यात आज ९८२ नव्या रुग्णांचे निदान, २७ मृत्युमुखी

आरोग्यमंत्री काय म्हणाले?

राज्याने १० कोटी लसीकरणाचा टप्पा पार केल्यानंतर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी करोनायोद्धांचे अभिनंदन केलं आहे. ‘महाराष्ट्राने आज दहा कोटी नागरिकांचे लसीकरण पूर्ण करण्याचा टप्पा गाठला. प्रत्येक जिल्ह्यात काम करणारे सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांच्या अथक परिश्रमातूनच हे यश साध्य झाले. सर्वांचे अभिनंदन करतो,’ असं ट्वीट राजेश टोपे यांनी केलं आहे.

एसटी महामंडळाची आक्रमक भूमिका; तब्बल ३७६ कर्मचाऱ्यांचं निलंबन

पहिल्या आणि दुसऱ्या डोसचे प्रमाण किती?

राज्याने १० कोटी लसीकरणाचा टप्पा पूर्ण केला असला तरी फक्त ३ कोटी २० लाख ७४ हजार ५०४ नागरिकांचे करोना लसीचे दोन्ही डोस झाले आहेत. तसंच राज्यात ६ कोटी ८० लाख ५३ हजार ७७ नागरिकांना करोना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे.

राज्यात मुंबई आणि पुण्याने लसीकरणात आघाडी घेतली आहे. मुंबईत १ कोटी ४९ लाख ९२ हजार ८२५ डोस देण्यात आले आहेत, तर पुण्यात १ कोटी २२ लाख ३३ हजार ३४० डोस दिले गेले आहेत.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: