पंढरपूर नगरपरिषदेकडून १३ फेब्रुवारीला महास्वच्छता अभियान : स्वच्छ पंढरपूरसाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे – डॉ.सौ.प्रणिता भगीरथ भालके
पंढरपूर नगरपरिषदेतर्फे १३ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ८ वाजता महास्वच्छता अभियानाचे आयोजन. पद्मावती उद्यान, स्टेशन रोड, छत्रपती शिवाजी महाराज चौकसह विविध ठिकाणी स्वच्छता उपक्रम राबविण्यात येणार.
Pandhapur municipal council news: पंढरपूर,दि. १२ फेब्रुवारी २०२६ : स्वच्छ आणि सुंदर पंढरपूर घडविण्याच्या उद्देशाने पंढरपूर नगरपरिषदेकडून महास्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे. हे अभियान दि. १३ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ८ वाजता शहरातील विविध ठिकाणी पार पडणार आहे.
या अभियानांतर्गत पद्मावती उद्यान, स्टेशन रोड परिसर, छत्रपती शिवाजी महाराज चौक, विवेक वर्धिनी शाळा परिसर तसेच भक्ती मार्ग रोड परिसर येथे विशेष स्वच्छता मोहिम राबविण्यात येणार आहे.

लोकनियुक्त नगराध्यक्षा डॉ.सौ.प्रणिता भगीरथ भालके यांनी नागरिकांना आवाहन करताना सांगितले की,स्वच्छ पंढरपूर ही आपली सर्वांची जबाबदारी आहे.शहर स्वच्छ ठेवण्या साठी प्रत्येक नागरिकाने पुढाकार घेणे आवश्यक आहे.
या उपक्रमात सर्व शाळा, महाविद्यालये, सामाजिक संस्था, विविध संघटना, नगरपरिषद कर्मचारी तसेच आरोग्य विभागाचे कर्मचारी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
महास्वच्छता अभियानाच्या माध्यमातून सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता, प्लास्टिक कचऱ्याचे निर्मूलन, जनजागृती आणि स्वच्छतेबाबत नागरिकांमध्ये सकारात्मक संदेश देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
पंढरपूर हे राज्यातील प्रमुख तीर्थक्षेत्र असल्याने येथे दररोज हजारो भाविक येत असतात. त्यामुळे शहर स्वच्छ, सुंदर आणि आरोग्यदायी ठेवणे ही काळाची गरज असल्याचे मत व्यक्त होत आहे.

