महायुतीचा महाविजय आणि कॅबिनेट मंत्रीपद प्राप्त झाल्याबद्दल अदितीताई तटकरे यांचा महाराष्ट्र प्रदेश गडकिल्ले संवर्धन सेलतर्फे सन्मान
पुणे/ज्ञानप्रवाह न्यूज-महायुतीचा महाविजय आणि कॅबिनेट मंत्रीपद प्राप्त झाल्यानंतर प्रथमच श्रीमंत दगडूशेठ गणेशाच्या दर्शनासाठी आलेल्या अदितीताई तटकरे यांचे महाराष्ट्र प्रदेश गडकिल्ले संवर्धन सेलतर्फे उस्फुर्त स्वागत करण्यात आले.

महाराष्ट्र प्रदेश गडकिल्ले संवर्धन सेल प्रदेशाध्यक्ष आणि सेलच्या प्रमुख पदाधिकार्यांसमवेत अदितीताई तटकरे यांचा शाल व छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी गड किल्ले संवर्धन सेल पदाधिकारी समीर धुमाळ, शंकर चिकणे,अविनाश जाधव,युवराज मुजुमले,महेंद्र देवघरे, संदीप खाटपे,नितीन,कुडले,संकेत धनावडे,नितीन कोंडळकर, अजित थोपटे योगेश परखंदे, जयदीप भापकर, विक्रम भिलारे, कुणाल शेलार, केतन पासलकर आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.


