भाजी विक्रेत्याचा मुलगा झाला सीए
पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज –पंढरपूर येथे भाजी विकणाऱ्या विठ्ठल गुंड यांचा मुलगा ऋषिकेश गुंड याने वयाच्या 24 व्या वर्षी कठोर परिश्रम घेऊन आपल्या घरच्या गरीब परिस्थितीवर मात करत सीए ची परीक्षा उत्तीर्ण होऊन नावलौकिक मिळवलेला आहे.

ऋषिकेश याचे वडील विठ्ठल गुंड हे पंढरपूर येथील इसबावी परिसरामध्ये भाजी विकण्याचा व्यवसाय करतात.ऋषिकेश ची आई पिठाची गिरणी चालवून संसाराला हातभार लावतात. घरची हालाखीची परिस्थिती ओळखून ऋषिकेश गुंड यांनी आपले शिक्षण सुरू ठेवत अन्यत्र काम करून शिक्षणाचा खर्च भागवीला. ऋषिकेश यांनी आपले दहावीपर्यंत शिक्षण रयत शिक्षण संस्थेचे यशवंत विद्यालय पंढरपूर येथे पूर्ण करून पुढील शिक्षण कर्मवीर भाऊराव पाटील कॉमर्स कॉलेजमध्ये पुढील शिक्षण पूर्ण केले.या कॉलेजमध्ये प्रथम येण्याचा मान त्यांनी या पदवी काळामध्ये केला. त्यानंतर ऋषिकेश यांनी पुढील शिक्षण सीए ची परीक्षा देण्यासाठी त्यांनी पुणे शहर गाठले. पुणे येथे गेल्यानंतर त्यांनी आपला पुढील शिक्षणाचा संपूर्ण खर्च खाजगी क्षेत्रामध्ये काम करून भागवला.
सीएससी ची परीक्षा देतेवेळी त्यांना असंख्य अडचणी आल्या परंतु त्यांनी न डगमगता ओ सीएससी परीक्षा दिली व त्यामध्ये ते उत्तीर्ण झाले आणि वयाच्या 24 व्या वर्षी सीए होण्याचा मान त्यांनी मिळवला.
ऋषिकेश गुंड याला कै.राजेंद्र गुंड सर, पीएसआय चुलते तानाजी गुंड व वडील विठ्ठल गुंड व आई यांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले असे त्यांनी बोलताना सांगितले.


