या करांच्या बदल्यात दररोज धुळच खावी लागतेय या धुळीमुळे त्यांच्या छातीत चिखल झाला म्हणत जिल्हा काँग्रेस ओबीसी आक्रमक

पंढरपूरातील धूळ समस्येप्रकरणी जिल्हा काँग्रेस ओबीसी आक्रमक …

पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०९/०१/२०२५ – पंढरपूर शहरात सगळीकडे धुळीचे साम्राज्य पसरलेले आहे व यामुळे सर्व पंढरपूरकरांना श्वसनाच्या त्रासाला व विविध आजारांना सामोरे जावे लागत आहे असा आरोप काँग्रेस ओबीसी चे माजी जिल्हाध्यक्ष समीर कोळी व जिल्हा काँग्रेस कमिटी यांनी करत नगर पालिका प्रशासनास निवेदन देऊन 25 जानेवारी पर्यंत जर पंढरपूरातील धुळीवर योग्य उपाययोजना न केल्यास प्रजासत्ताक दिनी उपोषणाचा इशारा देत धारेवर धरले आहे.

पंढरपूर ही महाराष्ट्राची दक्षिण काशी म्हणून ओळखली जाते येथे चार वाऱ्यांकरता कोट्यावधींचा निधी दिला जातो व नगर पालिका प्रशासन सुद्धा विविध करांच्या माध्यमातून कर आकारणी अगदी सक्तीने करत असते. मात्र या करांच्या बदल्यात दररोज धुळच खावी लागत आहे.या धुळीमुळे त्यांच्या छातीत चिखल झाला आहे.

नगरपालिकेकडे खूप वर्षांपूर्वी रोड स्विपर्स दाखल झालेले आहेत तरीपण रोड स्विपर्स गेल्या अनेक वर्षापासून वापरा अभावी स्वतःच धुळखात पडलेले आहेत तर माणसांचे काय ?

यावेळी सोलापूर जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष नागेश गंगेकर, जिल्हा उपाध्यक्ष सुहास भाळवणकर,जिल्हा सरचिटणीस राजाभाऊ उराडे ,तालुका अध्यक्ष हनुमंत मोरे,पंढरपूर मंगळवेढा विधानसभा युवक अध्यक्ष बलदेव शिकलकर, काँग्रेस वाहतूक संघटना जिल्हाध्यक्ष दिलीप फडतरे , समाजसेवक शिवाजी धोत्रे ,काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मामा फलटणकर व प्रा.अशोक डोळ, नागनाथ आधटराव ,धनंजय काकडे ,आनंद सोमासे, देवानंद इरकल,पंढरपूर मंगळवेढा सोशल मीडिया अध्यक्ष बाळासाहेब आसबे, बाळासाहेब अंकुशराव,युवराज जाधव, सचिन मगर ,भास्कर जगताप यांच्यासह आजी-माजी पदाधिकारी व काँग्रेस प्रेमी बहुसंख्येने उपस्थित होते.


Discover more from Dnyan pravah news

Subscribe to get the latest posts sent to your email.

Leave a Reply

Back To Top

Discover more from Dnyan pravah news

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading