महाकुंभ 2025 मध्ये जल जीवन अभियानाद्वारे प्रत्येक घरात नळाद्वारे पेयजल पुरवठा योजना

महाकुंभ 2025 मध्ये जल जीवन अभियानाद्वारे प्रत्येक घरात नळाद्वारे पेयजल पुरवठा योजनेतून बुंदेलखंडमध्ये घडलेल्या परिवर्तनाचे दर्शन घडणार

नवी दिल्‍ली /PIB Mumbai,9 जानेवारी 2025 – महाकुंभ 2025 साठी जगभरातून येणाऱ्या 40-45 कोटीपेक्षा जास्त भाविकांना उत्तर प्रदेशातल्या गावांमध्ये स्वच्छ सुजल गाव या संकल्पनेतून झालेला बदल अनुभवायला मिळेल. पेयजलाचा पर्याय – माझ्या गावाची नवी ओळख या संकल्पनेवर आधारित या उपक्रमाद्वारे एकेकाळी जलदुर्भिक्ष्याचा सामना कराव्या लागणाऱ्या बुंदेलखंड प्रदेशाने पेयजलाची समस्या सोडवणारा प्रदेश अशी ओळख मिळविली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वात जल जीवन अभियानाने प्रत्येक घरात नळाद्वारे पाणी पुरवठा करुन जल उपलब्धतेत क्रांती घडविली आहे. या यशोगाथेतून 2017 पूर्वी निराशाजनक परिस्थितीचा सामना करणाऱ्या बुंदेलखंडने त्यानंतर प्रगती करण्यापर्यंत कशी मजल मारली हे दिसून येते.

40 हजार एकर जागेवर उभारलेल्या या प्रदर्शनात प्रगत उत्तर प्रदेशाचे दर्शन घडते. यामध्ये पीएम आवास, सीएम आवास यासारख्या उपक्रमांसह ग्राम पंचायत विकास आणि सौर उर्जेचा पर्याय स्वीकारलेली गावे यांचा समावेश आहे. या प्रदर्शनात निरनिराळी भाषा बोलणाऱ्या लोकांसाठी इंग्रजी, हिंदी, बंगाली, तेलगू आणि मराठी अशा विविध भाषांमध्ये माहिती उपलब्ध आहे.

स्वच्छ सुजल गावाला भेट देणाऱ्या व्यक्तींचा नमामि गंगे आणि ग्रामीण जल पुरवठा विभागामार्फत सन्मान करुन अतिथी देवो भव ही भारतीय परंपरा जपली जाईल. पाहुण्यांना पर्यावरणपूरक ज्यूटच्या पिशव्यांमधून संगमाचे पवित्र जल, जल जीवन अभियानाची दैनंदिनी आणि जल उपक्रमांद्वारे घडलेल्या परिवर्तनाच्या कथा सांगणारे साहित्य दिले जाईल.

स्वच्छ सुजल गावात डिजिटल स्क्रीन व गेम्स यासारख्या सुविधा असलेला एक डिजिटल कोपरा देखील असेल. या गावाला भेट देणारे पाहुणे मनोरंजक व शैक्षणिक खेळांमधून पिण्याच्या स्वच्छ पाण्याचे फायदे आणि दूषित पाण्याचे धोके जाणून घेतील. खेळाच्या माध्यमातून जल संवर्धनाच्या महत्त्वाबाबत जनजागृती करणे हा या उपक्रमांचा उद्देश आहे.


Discover more from Dnyan pravah news

Subscribe to get the latest posts sent to your email.

Leave a Reply

Back To Top

Discover more from Dnyan pravah news

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading