क्रीडासंकुलच्या आरक्षित जागेवरील बेकायदेशीर व्यवहार रद्द
आरपीआय नेते दीपक चंदनशिवे यांच्या पाठपुराव्याला यश

पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज – पंढरपूर तालुक्यातील मौजे कासेगाव येथील गट नंबर १४/१/अ/२/अ या क्षेत्राबाबतची नोंदणीकृत खरेदीखत बाबतची धरण्यात आलेली फेरफार क्रमांक ३१०१२/३१०१२/३१०२६ ही नोंद सुनावणीनंतर सदर जागेवर आरक्षण असल्याचे तसेच खरेदी खत व्यवहार करताना अनेक चुकीच्या पद्धतीने माहिती देण्यात आली आहे.यामुळे बेकायदेशीर खरेदी झाल्याचे सिद्ध झाल्याने अर्जदार आरपीआय नेते दीपक चंदनशिवे यांच्या तक्रारीवरून अखेर उताऱ्यावरील फेरफार नोंद रद्द करण्यात आली आहे.या निर्णयामुळे पंढरपूर शहर व तालुक्यातील खेळाडू आणि क्रीडा प्रेमी नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
याबाबत कासेगावचे मंडल अधिकारी पंकज राठोड यांच्या न्यायालयात झालेल्या अपिलात तक्रारी अर्जदार आणि सामनेवाला यांच्यात झालेल्या युक्तिवादानंतर अर्जदार दीपक चंदनशिवे यांनी सदर जागेवर क्रीडा संकुलचे आरक्षण असल्याचे पुरावे सादर केले.अर्जदार यांचे तक्रारी अर्ज अंशतः मान्य करण्यात आला असून सदर जागेवरील खरेदी खता बाबत धरण्यात आलेली नोंद रद्द करण्याचे तसेच सदर आदेशाची अंमलबजावणी अपील कालावधी संपल्यानंतर करण्यात येणार असल्याचे आदेश मंडल अधिकारी यांनी काढले आहेत.
पंढरपूर तालुक्यातील कासेगाव येथील जागेवर क्रीडा संकुलचे आरक्षण असताना हि या जागेची खरेदी भास्कर लक्ष्मण कसगावडे, रा.बोहाळी ता.पंढरपूर,बिंदू मुकुंद गावंडे रा. पिकोने,आवरे जि.रायगड, दत्तात्रेय दादा खिलारे रा.कासेगाव ता.पंढरपूर, मंजुळा राजू पवार रा.कडबे गल्ली पंढरपूर व कर्मयोगी एस.आर परिचारक मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड पंढरपूर यांनी केली होती. या केलेल्या खरेदी खताबाबतची धरण्यात आलेली फेरफार नोंद अर्जदार रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(आ) गटाचे नेते दीपक जालिंदर चंदनशिवे रा.तिसंगी तालुका पंढरपूर यांच्या तक्रारीवरून रद्द करण्यात आली आहे.सुनावणी नंतर याबाबतचे आदेश २६ डिसेंबर २०२४ रोजी कासेगाव मंडलाधिकारी पंकज राठोड यांनी काढले आहे.
आता शासनाच्यावतीने गुन्हे दाखल करण्यात यावे : दीपक चंदनशिवे
या प्रकरणामध्ये प्राधिकरणाने आरक्षित केलेल्या भूखंड लाटण्याचा प्रयत्न केला गेला होता,खरेदी विक्री व्यवहार करताना झोन दाखला जोडला नाही,जमिन पड असताना बागायती क्षेत्र दाखवून शासनाची फसवणूक केली आहे. याबाबत शासनाने गुन्हा दाखल करणे बंधनकारक आहे. याचबरोबर पंढरपूर प्राधिकरणाने शहराच्या आसपास असणाऱ्या १०कि.मी.अंतरावरील ४१ गावांमध्ये अनेक प्रकारचे आरक्षण टाकलेली आहेत. ती आबाधित राहिली पाहिजेत ही आमची मागणी आहे.
दीपक चंदनशिवे ,नेते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ)
Discover more from Dnyan pravah news
Subscribe to get the latest posts sent to your email.