पाणपोई आर.ओ.प्लांट आणि जनावरांसाठी पाणपोईचा मा.आ.प्रशांत परिचारक यांच्या हस्ते शुभारंभ

पाणपोई आर.ओ.प्लांट आणि जनावरांसाठी पाणपोईचा मा.आ.प्रशांत परिचारक यांच्या हस्ते शुभारंभ

पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१२/०१/२०२५- श्री महावीर फाऊंडेशन पंढरपूर यांच्या व्दितीय वर्धापन दिनानिमित्त श्री महालक्ष्मी प्रतिष्ठान यांचे संयुक्त विद्यमाने स्व.सागर राजेंद्र दोशी यांचे स्मरणार्थ सामाजिक उपक्रम म्हणून पाणपोई आर.ओ.प्लांट तसेच जनावरांसाठी पाणपोईचे महावीर नगर व इसबावी येथे उद्घाटन होणार आहे.

विधानपरिषदेचे मा.आ.प्रशांत परिचारक यांच्या शुभहस्ते आणि बालरोग तज्ञ डॉ. शितल शहा यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम सोमवार दि. १३/०१/२०२५ रोजी सकाळी ११ वा. संपन्न होणार आहे.

या कार्यक्रमासाठी उपस्थित रहावे असे आवाहन महालक्ष्मी प्रतिष्ठान आणि महावीर फाऊंडेशन,पंढरपूर यांच्यावतीने करण्यात आले आहे.हा कार्यक्रम महालक्ष्मी फर्निचर लिंक रोड,पंढरपूर येथे सोमवार दि. १३/०१/२०२५ रोजी सकाळी ११ वा. होणार आहे.

यापूर्वीच महावीर फाऊंडेशन,पंढरपूर यांच्यावतीने शीतशव पेटी व इतर रुग्ण उपयोगी साहित्य/वस्तू गरजेनुसार माफक दरात सेवा उपलब्ध करण्यात आली आहे.

Leave a Reply

Back To Top