आकारी पडच्या जमिनी शेतकऱ्यांना परत मिळण्यासाठी सुलभ कार्यप्रणाली करण्याबाबत शासनासोबत बैठक घेणार – डॉ.नीलम गोऱ्हे

महाराष्ट्रातील आकारी पड जमीन बाधितांना शासनाच्या निर्णयाने न्यायाची आशा ,खेड तालुका व जि.पुणें येथील समस्त शेतकरी बांधवांचे प्रतिपादन

आकारी पडच्या जमिनी शेतकऱ्यांना परत मिळण्यासाठी सुलभ कार्यप्रणाली करण्याबाबत शासनासोबत बैठक घेणार – डॉ. नीलम गोऱ्हे

मुंबई, दि.१८ जानेवारी २०२५ : पुणे जिल्ह्यासह महाराष्ट्रा तील काही भागात गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या आकारी पड जमिनीसंदर्भातील संघर्षात विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे शेतकऱ्यांना महत्त्वाचे योगदान लाभले. यासंदर्भात शेतकरी आणि शासनाच्या अधिकाऱ्यांसमवेत दि. १४ नोव्हेंबर २०१९ रोजी डॉ. गोऱ्हे यांनी बैठक घेऊन शेतकऱ्यांना दिलासा मिळण्यासाठी शासनास निर्देश दिले होते. या अनुषंगाने अत्यंत सूक्ष्म अभ्यास करून शेतकरी बांधवांना या आकारी पडमधून बाहेर काढण्याचे काम नीलमताईंनी केल्यामुळे आज समस्त आकारी पड बाधित शेतकऱ्यांच्यावतीने त्यांना सन्मानचिन्ह देऊन त्यांच्या निवासस्थानी सत्कार करण्यात आला. तसेच, भविष्यात त्यांना न्याय देण्याचे कामात उपसभापती डॉ. नीलमताई गोऱ्हे यांच्या सहकार्यातुन व्हावे असे प्रतिपादन समस्त आकारी पड शेतकरी बांधवांच्यावतीने करण्यात आले.

राज्यशासनाने आकारी पड जमिनी शेतकऱ्यांना मिळण्या साठी रेडीरेकनरच्या २५% भरण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे.असे असले तरी आजच्या या अनौपचारिक बैठकीत आकारी पड बाधित शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांच्या सध्या स्थितीची माहिती दिली.यामुळे शासना कडून या निर्णयात शिथिलता आणली जावी अशी विनंती केली आहे. त्यासंदर्भात डॉ नीलमताई यांनी शासन स्तरावर प्रयत्न करावेत अशी विनंती शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने त्यांच्याकडे केली.

त्यावर या मागणीबाबत मी लवकरच वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बैठक घेऊन मंत्री महोदय, महसूल मंत्री त्याचबरोबर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यासमोर वस्तुस्थिती आणुन देवून सहकार्य करेन, असे आश्वासन डॉ.गोऱ्हे यांनी दिले आहे.

यावेळी बैठकीला पुणे जिल्हा भाजप उपाध्यक्ष गणेश सांडभोर बाधित शेतकरी, बी.के.कदम माजी पंचायत समिती सदस्य, खेड,बाळासाहेब दाते जिल्हाध्यक्ष इंडस्ट्रीयल असोसिएशन, नितीन दाते सामाजिक कार्यकर्ते,सिताराम कदम (बाधित शेतकरी), बाबासाहेब हजारे (बाधित शेतकरी) आदी उपस्थित होते.

लवकरच पुन्हा शेतकऱ्यांच्या आकारी पड जमिनीसंदर्भात उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे या बैठकीचे आयोजन करणार आहेत.


Discover more from Dnyan pravah news

Subscribe to get the latest posts sent to your email.

Leave a Reply

Back To Top

Discover more from Dnyan pravah news

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading