जालना येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मुख्य जनसंपर्क कार्यालयाचा उद्धाटन सोहळा संपन्न
शिव- शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारधारेवर चालणारा आपला पक्ष हा कायमच जनसेवेसाठी तत्पर राहील-उपमुख्यमंत्री अजित पवार

जालना/प्रतिनिधी,दि.२०/०१/२०२५- जालना येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मुख्य जनसंपर्क कार्यालयाचा उद्धाटन सोहळा opening ceremony उत्साहात पार पडला.

यावेळी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार deputy cm ajit pawar यांनी सांगितले की,या कार्यालयाच्या माध्यमातून जिल्ह्यातील तमाम नागरिकांची अडलेली कामं मार्गी लावली जातील तसंच प्रश्न सोडवले जातील, समस्यांचं निराकरण केलं जाईल.जिल्ह्याचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि कार्यकर्ते जनकल्याणाचं काम नेटानं पार पाडतील, असा विश्वास मला आहे असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी करत शिव- शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारधारेवर चालणारा आपला पक्ष हा कायमच जनसेवेसाठी तत्पर राहील,असा विश्वास त्यांनी दिला.

या कार्यक्रमासाठी पक्षाचे जालना जिल्हाध्यक्ष अरविंद चव्हाण,आमदार मनोज कायंदे,आमदार विक्रम काळे,आमदार सतीश चव्हाण, बुलढाणा जिल्हाध्यक्ष नाझेर काझी आदींसह मान्यवर, पदाधिकारी, कार्यकर्ते व सामान्य नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Discover more from Dnyan pravah news
Subscribe to get the latest posts sent to your email.