पालघर पोलीस दलाकडून रस्ता सुरक्षा अभियान २०२५ कार्यक्रमाचे आयोजन

पालघर पोलीस दलाकडून रस्ता सुरक्षा अभियान २०२५ कार्यक्रमाचे आयोजन

पालघर /ज्ञानप्रवाह न्यूज – मोटार वाहन अपघातास परिणामकारकरित्या आळा बसावा व नागरिकांमध्ये वाहतुकीच्या नियमांचा प्रचार व प्रसार होण्याकरीता दरवर्षी संपूर्ण देशभरात रस्ता सुरक्षा अभियान आयोजित करण्यात येते. केंद्र शासनाच्या निर्देशानुसार यावर्षीही दि.०१ जानेवारी २०२५ ते दि. ३१ जानेवारी २०२५ या कालावधीत ३६ वे रस्ता सुरक्षा अभियान २०२५ साजरा करण्याबाबत सुचित करण्यात आले आहे. त्याअनुषंगाने पालघर जिल्हा पोलीस व जिल्हा वाहतुक शाखा पालघर यांच्या वतीने दि. ०१ जानेवारी २०२५ ते दि. ३१ जानेवारी २०२५ या कालावधीत रस्ता सुरक्षा अभियान २०२५ संपुर्ण पालघर जिल्हयात राबविण्यात येत आहे. त्या अनुषंगाने संपूर्ण जिल्हयात वाहतुक नियमांबाबत जनजागृती व्हावी याकरीता वेगवेगळे कार्यक्रम राबवून जनजागृती करण्यात येत आहे.

रस्ता सुरक्षा अभियान २०२५ च्या अनुषंगाने जिल्हयात वेगवेगळया जनजागृती कार्यक्रमाचे तसेच उपक्रमांचे खालीलप्रमाणे आयोजन करण्यात आलेले आहे.

१) पालघर जिल्हयांतील महत्वाचे ठिकाणी बॅनर्स लावणे व महत्वाच्या ठिकाणी चौकसभा घेवुन वाहन चालकांना मोटार वाहन कायदा व सुरक्षितरित्या वाहन चालविण्याची माहिती देणे.

२) बेकायदेशिर वाहन चालविणारे वाहन चालकांवर प्रतिबंध आणण्यासाठी विरुध्द दिशेने वाहन चालविणारे, हेल्मेट न परिधान करता वाहन चालविणे, वाहन चालविताना मोबाईलवर बोलणारे, सिग्नल तोडणारे लायसन्स नसणारे इसमांविरुध्द विशेष मोहिम राबवुन कारवाई करणे.

३) शालेय विद्यार्थ्यांचे प्रबोधन, रस्ते सुरक्षा विषयांवर शाळेतील विद्यार्थ्यांना शाळेत जावून प्रबोधन करणे.

४) नागरीकांना लायसन्स व परवाना काढणेबाबत जनजागृती करणे,

५) रस्ते सुरक्षेबाबत निबंध, चित्रकला तसेच प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन करणे.

६) वाहन चालकांसाठी वाहतूक प्रबोधपर कार्यशाळा आयोजित करणे.

७) वाहन चालक व पोलीस अंमलदार यांचेसाठी ताणतणाच शिबिराचे आयोजन करणे.

८) मोटारसायकल रायडर करणा-या वाहन चालकांना रस्ते सुरक्षेबाबत व ओव्हर स्पिड व इतर वाहतुक नियम तोडणा-या वाहन चालकांना वाहतुक नियमांचे जनजागृती मार्गदर्शन व प्रबोधन करणे.

९) अपघातातील जखमींचा जिव वाचविणे व त्यांचेवर तातडीने उपचार करणे याबाबत मार्गदर्शन प्रबोधनपर जनजागृती कार्यक्रम करणे.

१०) महामार्गावरुन जाणा-या वाहनांना तसेच बैलगाड्यांना रिफ्लेक्टर लावणे.

११) मुख्य रस्ते व महामार्गावर, हद्दीतील रुग्णालये, अॅम्ब्युलन्स, क्रेन, स्थानिक पोलीस ठाणे, यांचे दुरध्वनी क्रमांकांचे बोर्ड लावणे.

१२) पालघर बोईसर मधील एस.टी. डेपो येथे वाहन चालकांसाठी कार्यशाळा आयोजन करुन वाहतुक नियमांची माहिती देऊन वाहतुक नियमांची जनजागृती करणे.

१३) बाईक रॅली काढुन वाहतुक नियमांची जनजागृती करणे.

“रस्ता सुरक्षा अभियान २०२५” च्या अनुषंगाने वाहतुक नियमांची जनजागृती व्हावी याकरीता जिल्हयात सर्व वाहतुक विभागांमध्ये महत्वाचे चौकात विना लायसन्स वाहन चालवु नये, वाहन चालवितांना मोबाईलचा वापर टाळा, वाहनात मोठ्या आवाजात गाणे वाजवु नका, वेग मर्यादेचे पालन करा, विना नंगरचे वाहन चालवु नये, वाहतुक नियमांचे उल्लंघन करु नये, सीट बेल्टचा वापर करा. याबाबतचे बॅनर लावण्यात आलेले असुन वाहतुक नियमांची जनजागृती करण्यात येत आहे.

पालघर जिल्हयातील सर्व वाहतुक विभागातील शाळा/महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे रस्ता सुरक्षा या विषयांवर शालेय विद्यार्थ्यांना वाहतुक नियमांचे मार्गदर्शन व प्रबोधन करण्यात आलेले असुन जनजागृती करण्यात येत आहे.

जिल्हयातील पालघर, बोईसर विभागातील महत्वाचे चौक तसेच सर्व महत्वाचे चौक याठिकाणी तीन चाकी रिक्षा, डमडम, इको, इत्यादी वाहन चालकांची चौक सभा आयोजित करुन वाहन चालकांना मोटार वाहन कायदा व सुरक्षितरित्या वाहन चालविण्याची माहीती देऊन वाहतुक नियमांची जनजागृती करण्यात येत आहे. सर्व दुचाकी विना हेल्मेट वाहन चालकांना पुष्प गुच्छ देऊन दुचाकी चालवितांना हेल्मेटचा वापर करावा याबाबत आवाहन करून जनजागती करण्यात येत आहे.

पालघर, बोईसर येथील एस.टी.डेपो वाहन चालकांसाठी कार्यशाळा आयोजीत करुन वाहतुक नियमांबाबत जनजागृती करण्यात आलेली आहे.

पालघर पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी जिल्ह्यातील सर्व नागरीकांना असे आवाहन केले आहे की,रस्ता सुरक्षितते विषयी जनजागृती करण्यासाठी रस्ता सुरक्षा अभियान अंर्तगत वरीलप्रमाणे उपक्रम राबविण्यात येणार असुन सदरचे अभियान यशस्वी करण्याकरीता सर्व नागरीकांनी वाहतुकीच्या नियमांचे पालन करुन पोलीसांना सहकार्य करावे.


Discover more from Dnyan pravah news

Subscribe to get the latest posts sent to your email.

Leave a Reply

Back To Top

Discover more from Dnyan pravah news

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading