वारकरी सांप्रदाय व भागवत धर्माचे विचार लहानपणापासून मनावर कोरले तर सुसंस्काराची बीजे मिळून ही मुले सुसंस्कारशील झाल्याशिवाय राहणार नाहीत

वाडीकुरोली येथे वारकरी बाल संस्कार शिबिराचा शुभारंभ

वाडीकुरोली/ज्ञानप्रवाह न्यूज –वाडीकुरोली ता.पंढरपूर येथे वारकरी बाल संस्कार शिबिराचा शुभारंभ वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन कल्याण काळे यांच्या हस्ते संपन्न झाला.दि.10 मे ते 25 मे या कालावधीत हे शिबिर संपन्न होणार आहे. यावेळी हभप दिलीप मोरे महाराज, सुदाम मोरे, धनंजय गुरव महाराज, राहुल फडतरे, वेदांत राकुंडे, वाडीकुरोलीचे सरपंच रामचंद्र काळे, माजी सरपंच सुभाष कुंभार,मधुकर काळे,तंटामुक्तीचे अध्यक्ष सत्यवान नाईकनवरे , योगेश काळे ,दिलीप काळे, प्राचार्य दादासो खरात पर्यवेक्षक सत्यवान काळे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी बोलताना कल्याण काळे म्हणाले की वारकरी सांप्रदाय व भागवत धर्माचे विचार लहानपणापासूनच विद्यार्थ्यांच्या मनावर कोरले तर सुसंस्काराची बीजे त्यांना मिळून भावी आयुष्यात ही मुले सुसंस्कारशील झाल्याशिवाय राहणार नाहीत.या शिबिराच्या माध्यमातून राबवल्या जाणाऱ्या स्तुत्य उपक्रमांचे त्यांनी कौतुक केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिबिराचे संयोजक आदेश काळे महाराज यांनी करताना सांगितले की पंधरा दिवसाच्या या शिबिराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना गायन, पखवाज व तबलावादन, प्रवचन कीर्तन इत्यादी उपक्रम शिकवले जाणार असून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना वारकरी संप्रदायाचे आचार विचार देण्याचा प्रयत्न शिबिराच्या माध्यमातून होणार आहेत.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समाधान प्रा.काळे यांनी केले.आभार हभप मधुकर काळे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *