पंढरपूर नगर परिषदेच्या वतीने शहरातील अनधिकृत होर्डिंग्ज काढण्याची धडक मोहीम

पंढरपूर नगर परिषदेच्यावतीने शहरातील अनधिकृत होर्डिंग्ज काढण्याची धडक मोहीम

पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१६/०५/२०२४- घाटकोपर मुंबई येथे झालेल्या होर्डिंग्जच्या दुर्घटनेनंतर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी तातडीने आपत्कालीन व्यवस्थापन बाबत मीटिंग आयोजित केली होती. या झालेल्या मीटिंगमध्ये ज्या ज्या शहरांमध्ये अनाधिकृत होर्डिंग्ज असतील त्यांच्यावर कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या होत्या.

त्यानुसार आज पंढरपूर नगरपालिकेचे प्रशासक तथा उपविभागीय अधिकारी सचिन इथापे, मुख्याधिकारी डॉ.प्रशांत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली उपमुख्याधिकारी सुनील वाळूजकर,नगर अभियंता नेताजी पवार,नगर रचना सहाय्यक सुहास झिंगे,सोमेश धट,लिपिक चिदानंद सर्वगोड,मुकादम नवनाथ पवार व अतिक्रमण विभागाच्या टीमने शहरातील असलेल्या सर्व होर्डिंग्जचा सर्व्हे करून 5 अनाधिकृत असलेल्या होर्डिंग्ज रात्री उशीर पर्यंत काम करून काढून टाकण्यात आल्या.

तसेच रेल्वे हद्दीमध्ये व शहरांमध्ये उपेंद्र पब्लिसिटी आणि बाबा पेस्टींग यांनी 55 होर्डिंग्ज लावले आहेत त्यांना नोटीस बजावण्यात आल्या असून लावलेल्या होर्डिंग्जचे स्ट्रक्चर ऑडिट त्वरित करून सात दिवसात अहवाल सादर करावा,जे बोर्ड स्ट्रक्चर ऑडिटनुसार लावली गेलेले नाहीत ते काढून घेऊन तसा अहवाल सादर करावा तसे न केल्यास व काही दुर्घटना घडल्यास ते स्वतः वैयक्तिक जबाबदार राहतील अशा नोटिसा बजावण्यात आलेले आहेत.संबंधित एजन्सी यांनी मुदतीत माहिती दिली नाही किंवा होर्डिंग काढून घेतले नाहीत तर त्यांच्यावर नगरपरिषदेच्यावतीने कायदेशीर कारवाई करणार असल्याची माहिती मुख्याधिकारी डॉ.प्रशांत जाधव यांनी दिली.

रोड डिव्हायडरवरतीही असेच अनधिकृत डिजिटल फलक लावण्यात आले असतात. या डिजिटल फलकांमुळे वळणावरती किंवा काही फलक रस्त्यावर आल्यामुळे वाहनांना अपघात घडत आहेत वाहनचालक जखमी झाले आहेत.काही डिजिटल फलक तुटून रस्त्यांवर त्यांच्या फ्रेम्सचा काही भाग धोकादायक अवस्थेत लोंबकळत असतो त्याबाबतही निर्णय घेतला जाणे गरजेचे आहे. अनेकवेळा आपल्याला एखादी दुर्घटना घडल्यानंतर तात्पुरत्या स्वरूपात जाग येते पुन्हा येरे माझ्या मागल्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *