कर्नल भोसले चौक शिव जन्मोत्सव समिती व नागेश भोसले मित्र मंडळाच्यावतीने आयोजित रंगभरण व चित्रकला स्पर्धा २०२५

कर्नल भोसले चौक शिवजन्मोत्सव समिती व नागेश भोसले मित्र मंडळाच्यावतीने आयोजित भव्य रंगभरण व चित्रकला स्पर्धा २०२५

बाल मित्रांच्या कलागुणांना वाव देणारी ही सर्वात मोठी स्पर्धा – माजी आमदार दत्तात्रय सावंत सर

पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज – छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९५ व्या जयंती निम्मित याही वर्षी अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त पंढरपूर शहर पातळीवर भव्य रंगभरण चित्रकला स्पर्धा सलग १३ वर्षापासून आयोजित करण्यात आली होती. सदर चित्रकला स्पर्धेचे उद्घाटन पुणे शिक्षक मतदार संघाचे माजी आमदार दत्तात्रय सावंत सर, मर्चंट बँकेचे माजी चेअरमन नागेश भोसले व समाजसेवक किरण भोसले,अमोल कुलकर्णी सर यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

या स्पर्धेत १५०० स्पर्धकांनी सहभाग नोंदवला.इयत्ता १ ली ,२ री व इयत्ता ३ री,४ थी या गटात रंगभरण आणि इयत्ता ५ ते ७ यामध्ये चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.

शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत यांनी बाल मित्रांशी संवाद साधून त्यांच्या कलागुणांना वाव देणारी ही सर्वात मोठी स्पर्धा आहे असे उद्गार काढले.

यावेळी बहुसंख्य पालक ,माता भगिनी उपस्थित होते.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी काशिनाथ गोगाव सर,चंद्रकांत देसाई सर,सतीश चंद्रराव सर, राजकुमार ढवळे सर,अशपाक मुजावर सर, सुहास मासाळ गुरुजी,महेश भोसले सर आणि मंडळातील सर्व सभासद प्रयत्नशिल होते.

Leave a Reply

Back To Top