आंतरधर्मीय विवाहात मुलींच्या बळजबरी धर्मांतराला रिपब्लिकन पक्षाचा विरोध- केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले
मुंबई /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.20-आंतरधर्मीय विवाह अनेक होत असतात.आंतर जातीय विवाह होतात.अशा विवाहांचे आम्ही स्वागत करतो.मात्र आंतरधर्मिय विवाहामध्ये मुलींचे जबरदस्ती धर्मांतर होत असेल त्याला आळा घातला पाहिजे.आंतरधर्मीय विवाहामध्ये मुलींच्या बळजबरी होणाऱ्या धर्मांतराला रिपब्लिकन पक्षाचा तीव्र विरोध राहील. आंतर धर्मीय विवाहात बळजबरी होणाऱ्या मुलींच्या धर्मांतराला रोखण्यासाठी महायुती सरकार तर्फे होणाऱ्या कायद्याला रिपब्लिकन पक्षाचा पाठिंबा आहे अशी भूमिका रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी स्पष्ट केली.
दलित मुलांचे मुस्लिम मुलींशी आंतर धर्मीय लग्न झाले असून त्यात मुस्लिम मुलीने आपला धर्म बदलला नसल्याचे उदाहरण अनेक ठिकाणी महाराष्ट्रात पहावयास मिळेल. आंतर धर्मीय विवाहानंतर आपला धर्म मुलींना किंवा मुलांना बदलण्याची जबरदस्ती होता कामा नये .आंतर धर्मीय विवाहानंतर बळजबरी होणारे धर्मांतराचे प्रकार रोखण्यासाठी होणाऱ्या कायद्यांना रिपब्लिकन पक्षाचा पाठिंबा राहील असे ना.रामदास आठवले म्हणाले.

