अवैधरित्या दारूची वाहतूक करणाऱ्या आरोपींवर पालघर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

अवैधरित्या दारूची वाहतूक करणाऱ्या आरोपींवर पालघर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

पालघर/ ज्ञानप्रवाह न्यूज दि.१७/०५/२०२४- लोकसभा निवडणुक २०२४ चे अनुषंगाने पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील पालघर यांनी जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी तसेच सर्व पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी आणि स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकार्यांची बैठक घेऊन अवैध धंदे तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या अनुषंगाने योग्य त्या कारवाई करण्याबाबत सुचना दिल्या होत्या.

त्या अनुषंगाने दि.१६/०५/२०२४ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पो.उप नि.स्वप्नील सावंत देसाई,पो.हवालदार कपिल नेमाडे, पो.हवालदार संदीप सरदार,पो.हवालदार संजय थांगडा, पो.अंमलदार बजरंग अमनवाड सर्व नेमणुक स्थानिक गुन्हे शाखा, पालघर यांनी वरिष्ठांचे आदेशाने पालघर जिल्ह्यामध्ये अवैध धंद्यावर कारवाई करीता तलासरी पोलीस ठाणेचे हद्दीमध्ये पेट्रोलींग करीत असताना त्यांना गुप्त बातमीदारा कडून खात्रीशीर माहिती मिळाली की,तलासरी बोबापाडा (प) ता.तलासरी,जि.पालघर येथे मोकळ्या जागेमध्ये बोलेरो पिकअप क्र. एमएच.-४८-सी क्यु-०४०९ मधुन अवैधरित्या विक्रीकरीता वाहतुक करुन आणलेली दमण बनावटीच्या विविध कंपनीच्या दारुचे बॉक्स हे बोलेरो पिकअप क्र. एमएच. १८ बीजी ४९३१ मध्ये खाली करीत आहेत.

मिळालेल्या खात्रीशीर माहितीच्या आधारे पो.उप नि.स्वप्नील सावंत देसाई व त्यांचे पथकाने वरील नमुद ठिकाणी छापा टाकला असता बोलेरो पिकअप मधुन दारुचे बॉक्स उतरवताना दिसणारे ३ अनोळखी इसम व त्यांना मदत करणारे इतर इसम हे जंगलाचा फायदा घेवून पळून गेले. नमुद ठिकाणी वरील क्रमांकाचे दोन पिक अप व एक सफेद रंगाची मारुती सुझुकी स्विफ्ट कार क्र. एमएच-०६-ए एस-२८९१ असे वाहने मिळून आली. सदर वाहने जप्त करून वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये खालील वर्णनाचा मुद्देमाल मिळून आलेला आहे.

१) १,१०,८८०/- रुपये किंमतीचे रॉयल चॅलेंज फायनेस्ट प्रिमीयम व्हिस्कीचे एकुण २८ बॉक्स,एका बॉक्समध्ये ७५० मि.ली.च्या एकूण १२ काचेच्या सिलबंद बाटल्या. प्रत्येकी ३३०/- रुपये किंमतीची. बॅच नं. 0108/L6.30.03.2024 for sale in U.T. dadara and nagarhaveli and daman and div only असे लिहिलेले.
२) १,६३,२००/- रुपये किंमतीचे रॉयल चॅलेंज फायनेस्ट प्रिमीयम व्हिस्कीचे एकुण ४० बॉक्स, एका बॉक्समध्ये १८० मि. ली. च्या एकुण ४८ काचेच्या सिलबंद बाटल्या. प्रत्येकी ८५/- रुपये किंमतीची. बॅच नं. 0002/L3.24.04.2024 for sale in U.T. dadara and nagarhaveli and daman and div only असे लिहिलेले.
३) ३८,४००/- रुपये किंमतीच्या इंम्पेरीयल ब्लु हॅण्ड पिक्ड ग्रेन व्हिस्कीचे एकुण १० बॉक्स, एका बॉक्समध्ये १८० मि.ली. च्या एकुण ४८ काचेच्या सिलबंद बाटल्या. प्रत्येकी ८०/- रुपये किंमतीची. बेंचनं. FL/2023-2024/0133 for sale in U. T. dadara and nagarhaveli and daman and div only असे लिहिलेले.
४) १९,२००/- रुपयेकिंमतीच्या मॅक्डोव्हेल नं. १ रिझर्व व्हिस्कीचे एकुण ५ बॉक्स, एका बॉक्समध्ये १८० मि.ली. च्या एकूण ४८ काचेच्या सिलबंद बाटल्या. प्रत्येकी ८०/- रुपयेकिंमतीच्या. बॅचनं. 0001/12.29.04.2024 for sale in U. T. dadara and nagarhaveli and daman and div only असे लिहिलेले.
५) १,२२,४००/- रुपये किंमतीच्या ऑलसिझन गोल्डन कलेक्शन रिझर्व व्हिस्कीचे एकुण ३० बॉक्स, एका बॉक्समध्ये १८० मि. ली.च्या एकुण ४८ काचेच्या सिलबंद बाटल्या. प्रत्येकी ८५/- रुपये किंमतीच्या. बॅच नं. 03/02.05.2024 for sale in U. T. dadara and nagarhaveliand daman and div only असे लिहिलेले.
६) ७८,०००/- रुपये किंमतीच्या ऑलसिझन गोल्डन कलेक्शन रिझर्व व्हिस्कीचे एकुण २० बॉक्स, एका बॉक्समध्ये ७५० मि. ली.च्या एकुण १२ काचेच्या सिलबंद बाटल्या. प्रत्येकी ३२५/- रुपये किंमतीच्या. बॅच नं. 120/15.03.2024for sale in U. T. dadara and nagarhaveli and daman and div only असे लिहिलेले.
७) १०,००,०००/- रुपये किमतीची एक सफेद रंगाची महिंद्रा बोलेरो पिकअप क्र. एमएच.-४८- सीक्यु-०४०९ त्याचेवर काळ्या रंगाची ताडपत्री असलेली.
८) १०,००,०००/- रुपये किमतीची एक सफेद रंगाची महिंद्रा बोलेरो पिकअप क्र. एमएच.-१८- बीजी- ४९३१ त्याचेवर हिरव्या रंगाचे कापड असलेले.
९) ५,००,०००/- रुपये किंमतीची एक सफेद रंगाची मारुती सुझुकी स्विफ्ट कार क्र. एमएच-०६-ए एस-२८९१

असा ११६६.४ लिटर दारू किंमत ५,३२,०८० रु व वाहणांची किंमत २५,००,००० रू असा एकुण ३०,३२,०८०/- रुपये किंमती चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

वरील पळून गेलेले ३ अनोळखी इसम व त्यांना मदत करणारे इतर इसम यांचेविरुध्द तलासरी पोलीस ठाणे येथे १४८/२०२४, महाराष्ट दारूबंदी अधिनियम १९४९ चे कलम ६५(अ) (ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून वरीष्ठांचे मार्गदर्शनाखाली गुन्ह्याचा पुढिल तपास हा पो.उप नि.स्वप्नील सावंत देसाई नेमणुक स्थानिक गुन्हे शाखा, पालघर हे करीत आहेत.

सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील पालघर,अपर पोलीस अधीक्षक पंकज शिरसाट पालघर, पोलीस निरीक्षक अनिल विभुते स्थानिक गुन्हे शाखा पालघर यांचे मार्गदर्शनाखाली,पो.उप नि. स्वप्नील सावंत देसाई , पो.हवालदार कपिल नेमाडे, पो.हवालदार संदीप सरदार, पो.हवालदार संजय धांगडा, पो.अंमलदार बजरंग अमनवाड सर्व नेमणुक स्थानिक गुन्हे शाखा पालघर यांनी उत्कृष्टरित्या पार पाडली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *