"मराठी भाषा" वर घोषवाक्य

[ad_1]

Marathi Rajbhasha Din
* माझी मराठी माझी मराठी,

सर्वांच्या खेळू द्या हो ओठी.

*आपणच आपणासी तारी,

मराठीची किमिया न्यारी.

* बोलावे शुद्ध, ऐकावे शुद्ध,

वाचावे शुद्ध, लिहावे शुद्ध,

मराठीच्या उद्धारासाठी,

कंबर कसुनी आम्ही कटिबद्ध.

* लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी,

जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी,

धर्म, पंथ, जात, एक मानतो मराठी,

एवढया जगात माय मानतो मराठी…

* साहित्याचा वारसा चालवूया गडे,

मराठी पाऊल पडते पुढे.

* “पुन्हा मानव जन्म मिळाला तर….

फक्त मराठीच होईन….”

* आम्हाला गर्व आहेत

मराठी असल्याचा !!

* स्वराज्य तोरण चढे,

गर्जती तोफांचे चौघडे,

मराठी पाऊल पडते पुढे !

* रुजवू मराठी, फुलवू मराठी !

चला बोलू फक्त मराठी !!

* साहित्याचा हा खजिना,

मराठी वाचवूनी जाणून घ्याना.

* माझा शब्द माझे विचार ,

माझा श्वास माझी स्फूर्ती ,

माझ्या रक्तात मराठी ,

माझी माय मराठी !!

* “वाहते रक्तातं माझ्या मराठी

गर्वांने सांगतो, आहे मी मराठी,

संस्कृती माझी माय ती मराठी

अभिमानाची ती माय मराठी ”

* “ज्ञानदेव बाळ माझा

सांगे गीता भगवंता

लक्ष द्या हो विणविते

मराठी मी त्याची माता

जागतिक मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा..

[ad_2]

Source link

Leave a Reply

Back To Top