लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठी आज मतदान सुरू

लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) पाचव्या टप्प्यासाठी आज मतदान

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) पाचव्या टप्प्यासाठी आज मतदान होत आहे.

देशातील एकूण 6 राज्यं आणि दोन केंद्रशासित प्रदेशात 49 जागांसाठी मतदान (Voting) पार पडणार आहे. महाराष्ट्रातील (Maharashtra Lok Sabha Voting 2024) हा मतदानाचा शेवटचा टप्पा असणार आहे.मुंबईतील सर्व सहा मतदारसंघ , ठाणे, कल्याण,भिवंडी ,नाशिक,दिंडोरी आणि धुळे या 13 जागांवर आज मतदार आपला हक्क बजावत आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र डॉ.श्रीकांत शिंदे,नरेश म्हस्के,मिहिर कोटेचा,अरविंद सावंत, अनिल देसाई,ॲड उज्ज्वल निकम,गजानन किर्तीकर यांचे चिरंजीव अमोल कीर्तिकर,पियुष गोयल,माजी मंत्री ॲड वर्षा गायकवाड अशा दिग्गजांचं भवितव्य आज ईव्हीएममध्ये बंद होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *