नगरपरिषद मुख्याधिकारी डॉ प्रशांत जाधव यांनी प्रशासक सचिन इथापे यांच्याकडे सादर केलेल्या शिलकी अंदाजपत्रकास मंजुरी

पंढरपूर नगरपरिषदेचे रू ६,४६,२१७/- शिलकी अंदाज पत्रक मंजूर

नगरपरिषद मुख्याधिकारी डॉ प्रशांत जाधव यांनी प्रशासक सचिन इथापे यांच्याकडे सादर केलेल्या अंदाजपत्रकास मंजुरी

प्रशासक प्रांताधिकारी सचिन इथापे

पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१२/०३/२०२५- महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ व महाराष्ट्र लेखा संहिता २०११ चे तरतुदीनुसार नगरपरिषद मुख्याधिकारी डॉ प्रशांत जाधव यांनी प्रशासक सचिन इथापे यांच्याकडे अंदाजपत्रक मंजुरीसाठी सादर केले होते.

त्यानुसार पंढरपूर नगरपरिषदेचे सन २०२४- २५ चे सुधारित व सन २०२५-२६ चे रक्कम रुपये ६,४६,२१७/- चे शिलकी अंदाजत्रकास नगरपरिषदेचे प्रशासक सचिन इथापे यांनी मंजूरी दिली आहे.

नगरपरिषद मुख्याधिकारी डॉ प्रशांत जाधव

पंढरपूर नगरपरिषदेचे सन २०२५-२६ चे अंदाजीत वार्षिक उत्पन्न प्रारंभिक शिलकेसह र.रू २६६ कोटी ४ लाख ६ हजार इतके असून खर्च र.रू.२६५ कोटी ९७ लाख ५९ हजार ७८३ आहे. वर्षाखेरीस रक्कम रुपये ६ लाख ४६ हजार २१७ इतकी अंदाजे शिल्लक राहतील.

सदर अंदाजपत्रकामध्ये 15 वित्त आयोग, वैशिष्ट्यपूर्ण योजना, विशेष वैशिष्ट्यपूर्ण योजना,नगरोत्थान राज्यस्तर,नगरोत्थान जिल्हास्तर,रमाई आवास योजना,प्रधानमंत्री आवास योजना,अग्निशमन सुरक्षा अभियान,यमाई तलाव सुशोभीकरण,प्राथमिक सोयी सुविधा विकास, मूलभूत सोयी सुविधा,स्वच्छ भारत अभियान, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी सुधार योजना,पाणीपुरवठा विषयक कामे,रस्ते दुरुस्ती,रस्ते बांधणी,नवीन गटारी यांची तरतूद करण्यात आलेली आहे.

सदर अंदाजपत्रकातील ठळक तरतूदी पुढील प्रमाणे आहेत -महिला बालकल्याण विकास २२ लाख
दिव्यांग निधी २२ लाख
लोकशाहीर आण्णाभाऊ साठे नागरी सुधार योजना ५ कोटी
नगरोत्थान राज्यस्तर रस्ते विकास ३० कोटी
नगरोत्थान राज्यस्तर पाणी पुरवठा २९ कोटी ७६ लाख
नगरोत्थान राज्यस्तर भुयारी गटार योजना ३० कोटी
नगरोत्थान जिल्हास्तर ५ कोटी
दलितेतर वस्ती सुधारणा योजना २ कोटी
प्रधानमंत्री आवास योजना ३ कोटी
रमाई आवास योजना ३ कोटी
माझी वसुंधरा अभियान ३ कोटी
रोडलाईट पाणीपुरवठा जलशुद्धीकरण केंद्र मलशुद्धीकरण केंद्र विज बिल १० कोटी ४१ लाख
स्मशानभूमी सुधारणा २५ लाख
गटार व नाले २५ लाख,काँक्रीट रस्ते १ कोटी, डांबरी रस्ते १ कोटी अशी तरतूद अंदाज पत्रकामध्ये मंजूर करण्यात आल्याची माहिती मुख्याधिकारी डॉ प्रशांत जाधव व लेखापाल करुणा शेळके यांनी दिली आहे.


Discover more from Dnyan pravah news

Subscribe to get the latest posts sent to your email.

Leave a Reply

Back To Top

Discover more from Dnyan pravah news

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading