एक हजार कामगारांना गृहपयोगी वस्तू संचाचे वाटप…
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्यावतीने सत्यशोधक कामगार संघटनेच्या माध्यमातून हे वाटप
पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज- महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या वतीने तसेच सत्यशोधक कामगार संघटनेच्या माध्यमातून एक हजार नोंदणीकृत आणि सक्रिय बांधकाम कामगारांना गृहोपयोगी वस्तू संचाचे वाटप डॉ.बाबासाहेब आंबेडकर नगर येथे करण्यात आले. हा उपक्रम बांधकाम कामगारांच्या दैनंदिन गरजा भागवून त्यांच्या जीवनमानात सुधारणा घडवून आणण्यासाठी राबवण्यात आला.

या कार्यक्रमात युरोपियन शुगरचे चेअरमन उमेश परिचारक यांच्या हस्ते गृहपयोगी वस्तूंचे वितरण करण्यात आले.या संचामध्ये ताट,वाट्या,ग्लास, पातेले, मोठे चमचे,मसाला डब्बा,प्रेशर कुकर,स्टील टाकी यांसारख्या आवश्यक वस्तूंचा समावेश करण्यात आला आहे.

यावेळी कामगारांना मार्गदर्शन करताना उमेश परिचारक म्हणाले,कामगार कल्याण मंडळ हे एकमेव महामंडळ आहे, जिथे कोणत्याही जाती-धर्माचा विचार न करता योजना राबविल्या जातात. कामगार संकल्पनेत जातविरहित समाजव्यवस्था प्रस्थापित होत आहे हे अभिमानास्पद आहे.तसेच पंढरपूर नगरपरिषदेच्या माध्यमातून कामगारांना घरकुल योजना मिळावी यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

या कार्यक्रमाला रवी सर्वगोड,शाहू सर्वगोड, प्रदीप परकाळे, सतिश सर्वगोड,ज्ञानेश्वर सर्वगोड, गणेश सर्वगोड, विजय शिकतोडे, किशोर कदम, समाधान भोसले, राजेंद्र सर्वगोड, अमोल पाटील, सिद्धनाथ सांवत, शरद सोनवणे, स्वप्नील कांबळे, सुरज साखरे, कृष्णा सर्वगोड, भुषण सर्वगोड, साहिल थोरात, संग्राम माने आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सत्यशोधक कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. या योजनेचा अधिकाधिक बांधकाम कामगारांनी लाभ घ्यावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.