स्वा.सावरकरांचे पंढरपूरवर विशेष प्रेम होते – अभयसिंह इचगावकर

ते संपूर्णपणे ब्रिटिशांच्या कैदेतुन मुक्त झाल्यावर प्रथम कोल्हापूरला जावून शिवछत्रपतींच्या गादीला वंदन करुन थेट पंढरपूर मध्ये दाखल झाले होते


ADVERTIISEMENT
-----------------------------------------------------


पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२८/०५/२०२४-स्वा.सावरकरांचे पंढरपूरवर विशेष प्रेम होते. ते संपूर्णपणे ब्रिटिशांच्या कैदेतुन मुक्त झाल्यावर प्रथम कोल्हापूरला जावून शिवछत्रपतींच्या गादीला वंदन करुन थेट पंढरपूर मधे दाखल झाले होते. तसेच सन १९३९ साली पंढरपूर मधे भरलेल्या हिंदू युवक परिषदेसाठी ते पंढरपूरात आले होते आणि सध्या ज्या ठिकाणी वीर सावरकरांचा पुतळा आहे त्याच ठिकाणाहून त्यांनी भाषण केले होते, असे उदगार हिंदुमहासभा नेते अभयसिंह इचगावकर यांनी काढले.वीर सावरकरांच्या १०४ व्या जयंती समारोहात ते बोलत होते. समारंभाच्या अध्यक्षस्थानी सावरकर प्रेमी मंडळाचे मोहन मंगळवेढेकर होते.

पुढे बोलताना अभयसिंह म्हणाले की, पंढरपूरमधे वीर सावरकर यांचा पुतळा व्हावा असा ध्यास क्रांतीवीर वसंतदादा बडवे यांनी घेतला होता.यासाठी प्रसंगी आपली ईस्टेट विका असे मृत्युपत्रच त्यांनी केले आहे. पण भागवताचार्य वा.ना. उत्पात,कै.प्रकाश उत्पात, कै.चंदूकाका कुलकर्णी यांनी पुढाकार घेऊन हा पुतळा पूर्ण केला. ज्याप्रमाणे एक कलावंत रणदीप हुड्डा यांनी आपल्या वाडवडिलांचे घर गहाण टाकून वीर सावरकरांवरील चित्रपट पूर्ण केला.

सर्वप्रथम आदर्श प्राथमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी वीर सावरकरांचे जयोस्तुते हे गीत सादर केले. सर्व मान्यवरांचे हस्ते पुतळा पुजन करण्यात आले.शांताराम कुलकर्णी यांनी सुत्रसंचालनासोबतच सर्वांना शपथ दिली.माजी नगरसेवक ऋषीकेश उत्पात यांनी आभार मानले.

या कार्यक्रमाला माजी आमदार प्रशांत परिचारक,सावरकर प्रेमी मंडळाचे सवाई सर, डॉ.मिलींद जोशी,चंदूकाका ताठे, हिंदुमहासभा शहराध्यक्ष विकास मोरे, भोले पुणेकर,विवेक बेणारे,तुकाराम चिंचणीकर उपस्थित होते.

या समारंभाला पंढरपूर नगरपरिषद मुख्याधिकारी डॉ प्रशांत जाधव , उपमुख्याधिकारी सुनील वाळुंजकर, आरोग्य अधिकारी श्री.तोडकर यांचेसह कर्मचारी वृंद उपस्थित होता. त्यांनी न.पा.वतिने वीर सावरकर पुतळ्याला वंदन करुन पुष्पहार अर्पण केला.


Discover more from Dnyan prawah news

Subscribe to get the latest posts sent to your email.


ADVERTIISEMENT
-----------------------------------------------------

Leave a Reply

Discover more from Dnyan prawah news

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading