क्रिकेटपटू केदार जाधव यांचा भारतीय जनता पार्टीत प्रवेश
आ.समाधान आवताडे यांच्या पुढाकाराने केदार जाधव भाजपवासी
आमदार श्री.आवताडे यांच्यावरती पक्षवाढीची मोठी जबाबदारी दिल्याचे सिद्ध
पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज-सोलापूर जिल्ह्याचे सुपुत्र भारतीय क्रिकेट संघातील क्रिकेटपटू केदार जाधव यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. विशेष म्हणजे पंढरपूर – मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांनी या प्रवेशासाठी पुढाकार घेतला होता आणि पक्ष प्रवेशवेळी ते उपस्थित ही होते.
माढा तालुक्यातील जाधववाडी येथील भूमिपुत्र आणि भारतीय क्रिकेट संघातून क्रिकेटचे मैदान गाजवलेला क्रिकेटपटू केदार जाधव यांने मंगळवारी मुंबईत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ.चंद्रशेखर बावनकुळे, कार्यकारी अध्यक्ष रविंद्र चव्हाण, पंढरपूर मंगळवेढ्याचे आ.समाधान आवताडे,कराडचे आ. डॉ.अतुल भोसले आदी उपस्थित होते.

यानंतर केदार जाधव यांच्यासमवेत आ. समाधान आवताडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट घेतली. मुख्यमंत्री फडणवीस यांनीही केदार जाधव यांच्या पक्ष प्रवेशाचे स्वागत केले आणि पक्षात केदार जाधव यांना योग्य प्रकारे मान सन्मान मिळेल,काम करण्याची मोठी संधी मिळेल अशी ग्वाही दिली.
याप्रसंगी सह्याद्री अतिथीगृहावरती विधान परिषद सदस्य श्री लाड यांनीही आमदार समाधान आवताडे यांच्या उपस्थितीत केदार जाधव यांना पक्षकार्याकरिता सदिच्छा व्यक्त करत शुभेच्छा दिल्या.
केदार जाधव यांच्या पक्ष प्रवेशामुळे भाजप कडे युवक आणि क्रीडा प्रेमी नागरिक आकर्षित होतील, त्यांच्या स्वच्छ प्रतिमेचा पक्षाला फायदा होईल, सोलापूर जिल्ह्यातील एक नामवंत क्रिकेटपटू भारतीय जनता पक्षा सारख्या मोठ्या पक्षात सामील झाल्यामुळे क्रीडा क्षेत्राच्या विकासाला मदत होईल, असा विश्वास आ.समाधान आवताडे यांनी व्यक्त केला.
खेळ म्हणलं की जिद्द,चिकाटी,समर्पण आणि अथक परिश्रम आलेच.क्रिकेटच्या मैदानापासून ते बॅडमिंटन कोर्ट असो, कुस्तीची रिंग असो किंवा बुद्धिबळाचे बोर्ड असोत, आपले खेळाडू हे एक बळ आहे.भाला फेकण्यापासून ते जिम्नॅस्टिक पर्यंत आणि क्रिकेटच्या फटक्यांपासून ते फुटबॉलच्या गोलपर्यंत आज आपला भारत देश आणि आपले खेळाडू प्रत्येक खेळात आपला ठसा उमटवत आहेत.हे नवचैतन्य जिवंत ठेवण्याकरिता आणि क्रीडा वैभवासाठी मी एक लोकप्रतिनिधी म्हणून कायमच प्रयत्नशील आहे असे मत यावेळी आमदार समाधान आवताडे यांनी व्यक्त केले.
याभेटीप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत आमदार समाधान आवताडे यांनी मतदारसंघातील विविध विषयांवरती चर्चा केली तसेच मतदारसंघातील उदयोन्मुख खेळाडूंकरिता राबविण्यात येऊ शकणाऱ्या क्रिडा प्रोत्साहन संबंधित योजना तसेच उपक्रमांवरती सकारात्मक चर्चा केली.
यावेळी उद्योजक सरोजभाई काझी तसेच पक्षातील मान्यवर सहकारी उपस्थित होते.
Discover more from Dnyan pravah news
Subscribe to get the latest posts sent to your email.