डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि निळ्या रंगाचे नाते काय?


ambedkar jayanti
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना मानणाऱ्या त्यांच्या कोट्यवधी अनुयायांसाठी निळा रंग हा आंबेडकरी चळवळीसाठी समानार्थी शब्द आहे. बाबासाहेब आंबेडकरांची विचारधारा मानणाऱ्या पक्षांनी देखील या निळ्या रंगाची निवड आपल्या ध्वजात केली आहे. जगातील सर्व नद्या महासागराला येऊन मिळतात आणि सागर निळा होऊन जातो. त्याप्रमाणे सर्व प्रवाह राष्ट्रात विलीन व्हावे, वर्ग, वर्ण, जाती, लिंग मुक्त एकसंध भारतीय समाज निर्माण व्हावा, असं डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं स्वप्न होतं

खरं तर बाबा साहेब आंबेडकर आणि निळ्या रंगाचं नातं काय आहे. बाबा साहेबांनी 1927 मध्ये स्थापित केलेल्या समता सैनिक दलाचा आणि राजकीय पक्षाचा रंग निळा होता. या पक्षांच्या टोप्या देखील निळ्या होत्या. हा निळा रंग त्यांची परंपरा, जागृत ठेवणारा रंग आहे. आभाळासारखी निळाई समाजात रुजावी हा त्यामागचा उद्देश आहे

बाबासाहेबांनी 1936 मध्ये स्वतंत्र मजूर पक्ष म्हणजे इंडिपेंडेंट लेबर पार्टीची स्थापना केली.

त्यावेळी मुंबई कौन्सिलच्या निवडणुकीत बाबा साहेब उभे होते. त्या पक्षाचे चिन्ह माणूस होते. नन्तर पुढे त्यांनी शेफाफे म्हणजे शेड्युल कास्ट फेडरेशनची स्थापना केली त्याचे निवडणूक चिन्ह हत्ती होते. आणि झेंड्याचा रंग निळा होता. त्रिकोणी आकाराच्या निळा झेंड्यावर तारे असा पक्षाचा ध्वज होता. समता सैनिक दलाची परिषद 30 जानेवारी 1944 रोजी कानपुर येथे झाली. या परिषदेत काही ठराव मंजूर करण्यात आले. या मध्ये सत्मता सैनिक दलाचा झेंडा कसा असेल या बाबत चर्चा झाली. तर समता सैनिक दलाच्या ध्वजाची लांबी चार फूट आणि रुंदी अडीच फूट असले. रंग निळा असेल. तर ध्वजेच्या वर डाव्या बाजूला 11 तारे पांढऱ्या रंगात असतील.  मधोमध पांढऱ्या रंगात सूर्य असेल तर खाली SCF अशी अक्षरे असतील. खाली उजव्या बाजूला SSD अक्षरे असती.

या ध्वजेचा अर्थ आहे स्वातंत्र्य , समता, बंधुता, आणि उध्दिष्टये पूर्ण करण्यासाठी संघर्ष करणे.. पुढे कालांतरानंतर आंबेडकरांनी राजकीय भूमिका विस्तृत करत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची घोषणा केली. पण ही पार्टी तयार होण्याआधीच त्यांचे 6 डिसेंबर 1956 रोजी निधन झाले.

Edited By- Priya Dixit 



Source link


Discover more from Dnyan pravah news

Subscribe to get the latest posts sent to your email.

Leave a Reply

Back To Top

Discover more from Dnyan pravah news

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading