भाजप महायुती सरकारने लाडकी बहिण योजनेतून दिलेले पैसे गॅस सिलेंडर दरवाढ करून लाडक्या बहिणींनीकडूनच वसूल करत आहे : चेतन नरोटे
गॅस दरवाढ विरोधात सोलापूर शहर काँग्रेस पदाधिकारी रस्त्यावर उतरून आंदोलन,चूल पेटवून भाकरी थापल्या
सोलापूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.११ एप्रिल २०२५- गॅस सिलेंडर,पेट्रोल,डिझेल दरवाढ, अन्य जीवनावश्यक वस्तूंच्या किमती सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला परवडेनाशा झाल्या आहेत.यास जबाबदार केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणाच्या विरोधात सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने खासदार प्रणिती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शहराध्यक्ष चेतन नरोटे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालय पूनम गेट येथे दरवाढ विरोधात काँग्रेसचे पदाधिकारी रस्त्यावर उतरून आंदोलन करताना महिलांनी चूल पेटवून भाकरी थापल्या निदर्शने आंदोलन करून दरवाढ करणाऱ्या भाजप, महायुती सरकारचा तीव्र निषेध करण्यात आला.

यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे म्हणाले की,अख्ख्या जगात गॅस,पेट्रोल डिझेल स्वस्त होतय पण भारतात मात्र मोदी सरकार गॅस,पेट्रोल,डिझेल,गॅस च्या किमतीत वाढ करून जनतेची लूट सुरू केली आहे. लाडकी बहिण योजनेतून दिलेले पैसे वसुली लाडक्या बहिणीकडून वसूल करण्याच्या धंदा भाजप सरकारने सुरू केला आहे.कच्चे तेल एप्रिल २०२४ ला ८४ डॉलर प्रति बॅरल होते एका वर्षात म्हणजे एप्रिल २०२५ मध्ये ६० डॉलर प्रति बॅरल इतके दर कमी झाले आहे. कच्चे तेल पहिल्यांदाच सर्वात स्वस्त झाले आहे.पण देशात मात्र भाजप सरकार दर वाढवत आहे.मनमोहन सिंग पंतप्रधान असताना १५० डॉलर प्रति बॅरल दर असताना ७० रुपये पेट्रोल आणि ३५० रुपये गॅस सिलेंडरचे दर होते.या इंधन दरवाढीमुळे मध्यमवर्ग,कामगार,शेतकरी,गृहिणी या सगळ्यांच्या खिशाला यातून चटका बसत आहे.महागाईचा भडका होत असताना सरकारला सामान्य माणसाचा विचार करायला वेळच नाही. देशातील जनतेला वक्फबिल,औरंगजेब,हिंदू मुस्लिम या सगळ्या भानगडीत गुंतवून मोदी साहेबांनी दरवाढीचा मोठ्ठा मास्टर स्ट्रोक मारला आहे. जनतेची लूट हाच सरकारचा एककलमी कार्यक्रम सुरू आहे.महागाई थेट स्वयंपाकघरात घुसली असून महिलांचे बजेट कोलमडले आहे.पुन्हा चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ आणली आहे.सामान्य लोक हे फक्त कर भरण्यासाठीच उरले आहेत का ? केंद्रातील नरेंद्र च्या थापा आणि राज्यातील देवेंद्र च्या गप्पा हे दोघे सर्वसामान्य जनतेला महागाईने रडवत आहेत. जनतेचे हाल करत आहेत.म्हणून सरकारने तात्काळ सर्वसामान्यांचा विचार करून गॅस,पेट्रोल, डिझेल ची दरवाढ मागे घ्यावी.
या आंदोलनात शहराध्यक्ष चेतन नरोटे, महिलाध्यक्षा प्रमिला तुपलवंडे,माजी महापौर आरिफ शेख,मा.नगरसेवक दत्तू बंदपट्टे, हारून शेख,भोजराज पवार,मा.नगरसेविका परवीन इनामदार, जुबेर कुरेशी,भीमाशंकर टेकाळे, शकील मौलवी, राहुल वर्धा, युवराज जाधव,वाहिद बिजापूरे,नजीब शेख, विश्वनाथ साबळे,अंबादास गुत्तीकोंडा, बसवराज म्हेत्रे,तिरुपती परकीपंडला, बाबुराव म्हेत्रे, अशोक कलशेट्टी, अँड केशव इंगळे,हेमाताई चिंचोलकर,सुमन जाधव, अनिल मस्के,सागर उबाळे,संजय गायकवाड, सुबोध सुतकर,रुपेश गायकवाड, विवेक कन्ना,शिवशंकर अजनाळकर,गिरिधर थोरात,लखन गायकवाड,परशुराम सतारेवाले,राजेश झंपले,वशिष्ठ सोनकांबळे, तौसिफ शेख,अप्पू शेख,भीमराव शिंदे, धीरज खंदारे,सुभाष वाघमारे,शिवाजी साळुंखे,शुभांगी लिंगराज, शोभा बोबे, मुमताज तांबोळी,ज्योती गायकवाड, मुमताज शेख,चंदा काळे,वराह अतनुरे, करिमुनिसा बागवान,दशरथ सामल,श्याम केंगार,शिवाजी साळुंखे,अमीर शेख,बालाजी जाधव,अनिता भालेराव,छाया हिरवटे,संदेशा गायकवाड, सानीया पठाण, धैर्यशील बाबरे, बन्नप्पा कंपली, रफिक रामपूरे,रेहान शेख, दत्तात्रय पवार,जिलानी मुजावर, महिबुब शेख,सुमन काळे,कामाक्षी जाधव, सुनील डोळसे,शकुर शेख, जब्बार शेख, मार्था रावडे, सुजाता भंडारे,श्रीकांत साखरे, अभिलाष अच्युगटला,अमजद शेख, महेश धोत्रेकर यांच्यासह इतर पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.