जातीपातीचे निर्मूलन करण्याची नामी संधी संविधानात आहे : ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब बडवे

जातीपातीचे निर्मूलन करण्याची नामी संधी संविधानात आहे : ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब बडवे

पंचशील मंडळाच्या वतीने पत्रकारांचा सन्मान

पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज – आज सर्व समाज जाती-जातीत विभागल्याने भारतीय स्वातंत्र्यावर एक संकट उभारले आहे. हे संकट जर घालवायचे असेल तर जगातील एकमेव महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाने हे शक्य होईल त्यांच्या महान कार्याची प्रेरणा मिळावी यासाठी पंढरपुरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या ठिकाणी बाबासाहेबांचे भव्य असे स्मारक झाले पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त करत यासाठी सर्व पत्रकार पाठीशी राहतील असा विश्वास जेष्ठ पत्रकार बाळासाहेब बडवे यांनी दिला.

पंचशील तरुण मंडळ यांच्या वतीने भीम जयंतीचे औचित्य साधून पंढरपुरातील पत्रकार बांधवांचा जुना कराड नाका येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची दुर्मिळ अशी प्रतिमा भेट देऊन सन्मान करण्यात आला त्याप्रसंगी ते बोलत होते.

त्याठिकाणी मंडळाचे अध्यक्ष ॲड.महेश कसबे, दिपक चंदनशिवे, आर.पी.कांबळे, बाळासाहेब कसबे, जितेंद्र बनसोडे, मुकुंद मागाडे, दीपक साबळे, पोपट क्षीरसागर, सुजय बनसोडे, सचिन गाडे, राजेंद्र भालेराव, संदीप कसबे, निलेश कांबळे, शशिकांत चंदनशिवे, सागर चंदनशिवे यांच्यासह महिला, मंडळातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
त्याचबरोबर जेष्ठ पत्रकार सुनील उंबरे,ॲड. संदीप कागदे, काकासाहेब केंगार यांची समयोजित भाषणे झाली.

ते पुढे बोलताना म्हणाले की महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बाबत पुष्कळ बोलता येईल. बाबासाहेबांच्या वेळी राजकारण शुद्ध आणि चारित्र्यसंपन्न होते. आजचे राजकारण, समाजकारणच काय पत्रकारितेतही बदल झाला आहे. हे सर्व पूर्वपदावर आणायचे असेल तर महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानामुळे शक्य होईल असा विश्वास बडवे यांनी व्यक्त केले.

याप्रसंगी त्यांनी पंचशील तरुण मंडळाने डॉल्बी मुक्त जयंती साजरी करण्याचा संकल्प केल्याने तसेच समाज हिताचे उपक्रम राबवल्याबद्दल मंडळाला बाबासाहेबांच्या तत्त्वज्ञानाचे सुर घावले असल्याचे उदगार काढत कौतुक केले.यावेळी जेष्ठ पत्रकार अभय जोशी, सुनील उंबरे, हरिभाऊ प्रक्षाळे, रामभाऊ सरवदे, पत्रकार दिपक चंदनशिवे, सचिन कांबळे, सुधीर सोनटक्के, दिनेश खंडेलवाल, अपराजित सर्वगोड, सुरज सरवदे, नवनाथ खिलारे, राजेंद्र ढवळे, विनोद पोतदार, लखन साळुंखे, नागेश काळे यांच्यासह सर्व तालुक्यातील पत्रकार बांधव उपस्थित होते.

पंचशील तरुण मंडळाच्या वतीने यंदा आगळीवेगळी जयंती उत्सव साजरा करण्याचे आयोजन करण्यात आले होते.
यामध्ये सर्व पत्रकार संघ, डॉक्टर असोसिएशन, इंजिनीयर असोसिएशन तसेच वकील संघाच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची पूजन करून त्यांचा येतोचित सन्मान करण्यात आला.त्याचबरोबर महिलांसाठी होम मिनिस्टर, भीम गीतांचा कार्यक्रम असे स्तुत्य उपक्रम राबवण्यात आले. आणि १९ एप्रिल रोजी पारंपारिक पथकाद्वारे नृत्य सादर करून मिरवणूक काढण्यात येणार असल्याची माहिती अध्यक्ष एडवोकेट महेश कसबे यांनी दिली.

Leave a Reply

Back To Top