केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन
पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि १९ :- केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी आज सपत्नीक श्री विठ्ठल- रुक्मिणी मातेचे दर्शन घेतले.

यावेळी मंदिर समितीच्यावतीने मंदिर समितीचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांच्या हस्ते केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री श्री जाधव यांचा शाल व श्री विठ्ठल-रुक्मिणीची मूर्ती देवून सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. महेश सुडके, सांगोला उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.अरविंद गिराम, मंगळवेढ्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ.जानकर तसेच मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.

