पंढरपूर येथील गोपाळपुर येथे कायदेविषयक शिबीर संपन्न
पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.24 :- पंढरपूर तालुका विधी सेवा समिती, व पंढरपूर अधिवक्ता संघ यांच्या संयुक्त विद्यमाने किमान समान शिबीरांतर्गत गोपाळपुर ग्रामपंचायत ता.पंढरपूर येथे तालुका विधीसेवा समिती अध्यक्ष तथा जिल्हा न्यायाधीश डी.एन.सुरवसे यांच्या मार्गदर्शनाखाली सह दिवाणी न्यायाधीश ए. ए.खंडाळे पंढरपूर यांच्या अध्यक्षतेखाली कायदेविषयक शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी न्यायाधीश ए.ए.खंडाळे, यांनी उपस्थित ग्रामस्थांना कायदेविषयक जनजागृती करुन त्यांना त्यांच्या हक्का विषयी मार्गदर्शन केले. ॲड.आर.ए.पुजारी यांनी गावक-यांना बाल मजुर कायदे विषयी मार्गदर्शन केले.

तत्पुर्वी कायदेविषयक शिबीराची प्रस्ताविका अधिवक्ता संघाचे अध्यक्ष ॲड.आर.बी. चौगुले यांनी केले, तर सुत्रसंचालन अधिवक्ता संघाचे सचिव ॲड.ए.एम. देशमुख यांनी केले. कार्यक्रमाचे आभार ॲड.गणेश चव्हाण यांनी मानले.
सदर शिबीरास वकिल संघाचे सदस्य ॲड. शितल आसबे, ॲड.एम.ए.नळे तसेच विधी स्वयंसेवक,ॲड.वाघमारे,नंदकुमार देशपांडे, सुनील यारगट्टीकर, पांडुरंग अल्लापुरकर, तसेच न्यायालयीन कर्मचारी व ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.

