श्री विठ्ठल रूक्मिणी मातेचे पदस्पर्शदर्शन सुरू
आषाढी नियोजनाची कामे वेळेत पूर्ण करण्याच्या प्रशासनास सुचना
तळघरात मिळालेल्या मुर्ती संग्रहालयात जतन करणार – सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर

पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज,ता.02 – गर्भगृहातील संवर्धनाचे काम आषाढी यात्रा 2024 पूर्वी पूर्ण करण्याचे असल्याने दि.15/03/2024 पासून कामास सुरुवात करण्यात आली तेंव्हापासून पदस्पर्श दर्शन बंद करुन पहाटे 5.00 ते सकाळी 10.45 वाजेपर्यंत मुखदर्शन सुरु ठेवण्यात आले होते. तथापि, सदर काम पूर्णत्वास आल्याने भाविकांसाठी आज दि. 02/06/2024 पासून श्रींचे पदस्पर्शदर्शन सुरू करण्यात आले आहे. तसेच मंदिर समितीच्या वतीने श्रींची पहाटे 4.00 वाजता नित्यपुजा संपन्न झाली.या पुजेस सोलापूर जिल्हा पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील, आ.बबनदादा शिंदे, आ. समाधान आवताडे आ.प्रशांत परिचारक,मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर,मंदिर समितीचे सदस्य, सल्लागार परिषदेचे सदस्य, वारकरी संघटनेचे प्रतिनिधी तसेच पत्रकार उपस्थित होते.
श्रींची नित्यपुजा झाल्यानंतर पदस्पर्श दर्शन रांगेतील बालाजी मनोहर मुंडे व सरस्वती बालाजी मुंडे,रा.मनुर जि.अदिलाबाद या प्रथम भाविकांना श्रींचे पदस्पर्शदर्शन घडवून पदस्पर्श दर्शनाची सुरवात करण्यात आली.
तद्नंतर आषाढी यात्रा 2024 नियोजना बाबत सह अध्यक्ष यांच्या दालनात सकाळी 9.30 वाजता सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या अध्यक्षतेखाली सभा संपन्न झाली. या सभेत आषाढी यात्रेत भाविकांना देण्यात येणा-या सोईसुविधांचा आढावा घेण्यात आला.त्यामध्ये दर्शनरांगेचे व्यवस्थापन चांगल्या पध्दतीने करून संबंधित सर्व कामे वेळेत पूर्ण करण्याच्या सुचना सहअध्यक्ष यांनी प्रशासनास दिल्या. तसेच मंदिरातील संवर्धन काम करतेवेळी हनुमान गेट येथे मिळालेल्या तळघरातील मुर्ती संग्रालयात जतन करून ठेवणे व तळघराच्या ठिकाणी माहितीची कोणशीला बसवण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच दर्शनरांगेतील कायमस्वरूपी पत्राशेडची दुरूस्ती करून नव्याने 2 कायमस्वरूपी पत्राशेड उभारण्याचे ठरले.
या सभेस सदस्या शकुंतला नडगिरे, डॉ. दिनेशकुमार कदम, भास्करगिरी गुरू किसनगिरी बाबा,संभाजी शिंदे,ॲड.माधवी निगडे,ह.भ.प.ज्ञानेश्वर देशमुख जळगांवकर, ह.भ.प.श्री. प्रकाश जवंजाळ,ह.भ.प.शिवाजी़ मोरे, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके व व्यवस्थापक बालाजी पुदलवाड आदी उपस्थित होते.
Discover more from Dnyan pravah news
Subscribe to get the latest posts sent to your email.