बांबू आणि औषधी वनस्पती जतन- संवर्धन- रोपण-उद्योजकता विषयक एकदिवसीय कार्यशाळा

बांबू आणि औषधी जतन- संवर्धन- रोपण-उद्योजकता विषयक एकदिवसीय कार्यशाळा

पुणे/ज्ञानप्रवाह न्यूज – सध्याची राज्यात-देशातील पर्यावरण विषयक प्राथमिकता लक्षात घेता मोठ्या प्रमाणात हरित क्षेत्र वाढविण्याची नितांत गरज आहे. शिवाय ह्या हरितीकरणाच्या माध्यमातून स्थानिक शेतकऱ्यांना आर्थिक स्त्रोत वाढावेत ह्या हेतूने आणि विचाराने बांबू स्वराज्य मोहिमे अंतर्गत स्थानिक शेतकऱ्यांसाठी बांबू आणि औषधी वनस्पती जतन-संवर्धन-रोपण-उद्योजकता विषयक एकदिवसीय कार्यशाळा आयोजित केली आहे. या विशेष कार्यशाळेत मान्यवरांची उपस्थिती, तज्ञ मंडळींची सदीप व्याख्याने, शासकीय योजना, तज्ञ-संशोधक-शासकीय अधिकारी-शेतकरी परिसंवाद इ.बाबत मार्गदर्शन होणार आहे. ही कार्यशाळा निःशुल्क आहे. सदर कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांनी पूर्व-नोंदणी करणे आवश्यक आहे.या कार्यशाळेसाठी जागा मर्यादित आहेत याची कृपया सर्वांनी नोंद घ्यावी.

सदर कार्यशाळेचे आयोजन पुणे वन विभाग-प्रादेशिक भोर उपविभाग, बायोस्फिअर्स संस्था,बांबू स्वराज्य मोहीम- संकल्प सुराज्याचा; बांबू संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र, चिचपल्ली; क्षेत्रीय सह सुविधा केंद्र-पश्चिम विभाग, राष्ट्रीय औषधी वनस्पती मंडळ,आयुष मंत्रालय – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे; महाराष्ट्र शासन कृषी विभाग, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) भोर, इकोस्फिअर यांच्या एकत्रित प्रयत्नातून आणि संयुक्त विद्यमाने होत आहे.

संपर्क: ९५०३०९६४६९, ९८२२३३५४३६, ९४२०९०७०९८
ई-मेल: bambooswarajyamohim@admin

मंगळवार, ११ जून २०२४
वेळ: सकाळी १०.०० ते सायंकाळी ५.३०
स्थळ: पंचायत समिती हॉल -भोर, दुसरा मजला, तालुका भोर, जिल्हा पुणे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *