सेल्फी व्हिक्टरीचा,तुमच्यासाठी धोक्याचा सायबर भामट्यांचा नवा सापळा – ॲड.चैतन्य भंडारी
धुळे/पुणे /ज्ञानप्रवाह न्यूज – पूर्वीच्या मोबाईलमधील फ्रंट कॅमेरा म्हणजे सेल्फी मोड साईडचा याची लेन्स तितकी अप टू द मार्क नसल्याने फोटो फारसे चांगले (sharp) येत नसत.मात्र वरचेवर तंत्रज्ञानाने ती उणीव भरून काढली असून आताचे मोबाईल इतके टॉप एन्ड लेन्ससारखे केलेत की सेल्फी मोडवरही फोटो अगदी सुस्पष्ट (sharp) येतात.त्यामुळे अनेकांना विशेषत: तरुणाईला खूप आनंद झाला आहे.
मात्र हे मॉडर्न कॅमेरे तुम्हाला आनंद देणार असले तरी सायबर भामट्यासाठी एक नवीन संधी उपलब्ध झाली आहे तुम्हाला जाळ्यात अडकवून लुटायची.अगदी तुमचा मोबाईल, तुमची गॅलरी,तुमचे बँक अकाउंट सगळं सगळं भामटा एका क्षणात लंपास करू शकणार आहे.

ती पद्धत कशी आहे आणि व्हिक्टरीची खूण करत काढलेल्या सेल्फीमुळे नेमका धोका काय होतो ते पाहूया- तुम्ही जेव्हा व्हिक्टरी खूण करत सेल्फी काढता.त्यानंतर तो नुसता काढत नाही तर तुम्ही ते तुमच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरही टाकता.मित्रमंडळी तुम्हाला लाईक्स / कॉमेन्ट्सचा मारा करतात. तुम्हीही खुश होता. मात्र सायबर भामटे पण आता सोशल प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणावर सक्रिय झाले असून ते अशा व्हिक्टरी सेल्फी फोटोच्या शोधातच असतात.तुम्ही काढलेला तो तुमचा व्हिक्टरी फोटो त्यांना सापडला की तो फोटो ते त्यांच्याकडे डाउनलोड करून घेतात आणि अतिशय प्रगत अशा एआय सॉफ्टवेयरच्या मदतीने तुमच्या व्हिक्टरी खूण करतानाच्या बोटांवरील रेषा (finger tips) सॉफ्टवेअर फोटोतून बाहेर काढून (extract) करून स्वतंत्र अशी फिंगर प्रिंट तयार करतात.
अशा रीतीने एकदा तुमची फिंगर प्रिंट त्या लोकांना मिळाली की,त्याच्या मदतीने ते अनेक ठिकाणी गैरकानूनी पद्धतीने वापर करून तुम्हालाच गोत्यात आणतात.
ते धोके काय असू शकतात त्याबाबत थोडक्यात म्हणजे तुमचा फोन ताबा चोरला जाऊन नंतर तुमच्याच त्या फिंगरप्रिंट च्या मदतीने तुमचा फोन अनलॉक केला जातो. शेकडा ९०% लोक अंगठा अथवा पहिले बोट फिंगर लॉकसाठी वापरतात असे आढळले आहे आणि थोडे सजग असलेले लोक मधल्या बोटाचा वापर करतात.म्हणजेच सुमारे ९५ टक्के लोक संकटात येऊन नव्या सापळ्यात सहज अडकू शकणार आहेत.
एकदा का तुमचा फोन अनलॉक केला की त्यातला सगळा डेटा ते हॅकर्स चोरतात आणि त्यातून ते संकटात टाकतात अथवा गॅलरीतील फोटो चोरतात आणि त्याचे मॉर्फिंग करून तुम्हाला इमोशनल ब्लॅकमेल करून तुमच्याकडून पैसे उकळले जातात.
जिथे जिथे सिक्युरिटी म्हणून एंट्रन्स गेटवर बायोमेट्रिक लॉक आहेत जिथे तुमची फिंगरप्रिंट स्टोअर आहे, तिथं ते भामटे तुमच्या नकळत सहजपणे आत शिरून तुमच्या कार्यालयीन कामातली महत्वाची माहिती ते हॅक करु शकतात. काही बँकांमध्ये कॅशियर समोरची गर्दी कमी व्हावी म्हणून एटीएम सारखे बायोमेट्रिक लॉकिंग सिस्टीम असलेले यंत्र ठेवलेले आहेत तिथं हॅकर्स तुमच्याच डुप्लिकेट तयार केलेल्या फिंगर प्रिंटचा वापर करून तुमच्या खात्यातून पैसे पळवू शकतात आणि अशा केसमध्ये नंतर तुम्ही बँकेत तक्रार करायला गेला तरी बँकवाले ती स्वीकारत नाहीत कारण फिंगरप्रिंट तुमचेच आहेत,असं ते म्हणणार. मुळातच असे व्हिक्टरी खुणेचे फोटो काढलेच तरी ते सोशल मीडियावर टाकू नका. समजा टाकायची इच्छाच असेल तर फोटो एडिटर अथवा तत्सम फोटो इफेक्ट द्वारे फिंगर टिप्स एरिया ब्लर करा. म्हणजे मित्रांना व्हिक्टरी तर जाणवेल आणि भामट्याला शार्प फिंगर टिप्स तिथं न मिळाल्याने ते तुमचा नाद सोडून देतील.आता यापूर्वी कधी असे फोटो तुम्ही काढून सोशल वर टाकले असतील तर ते चेक करा आणि जमलंच तर डिलीट तरी करा किंवा बोटांचा एरिया ब्लर तरी करा. (edit) करुन नुकसान झाल्यानंतर रडत बसण्याऐवजी आधीच सावध व्हा असे आवाहन सायबर तज्ञ ॲड.चैतन्य भंडारी व डॉ.धनंजय देशपांडे,पुणे यांनी केले आहे.
Discover more from Dnyan pravah news
Subscribe to get the latest posts sent to your email.