प्रचंड बहुमताने विजयी केल्याबद्दल अक्कलकोट तालुक्यातील सर्व जनतेचे, शेतकऱ्यांचे, सहकार्य केलेल्या काँग्रेस महाविकास आघाडी, इंडिया आघाडीच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांचे आभार – प्रणिती शिंदे

अक्कलकोट तालुक्यात नवनिर्वाचित खासदार प्रणिती शिंदे यांचा कृतज्ञता मेळावा

सोलापूर / ज्ञानप्रवाह न्यूज,दि.११ जून २०२४- हा विजय सोपा नव्हता, मोदी आले, योगी आले, अनेक मंत्री आले तरीही माझा विजय झाला. केवळ तुमच्यामुळे हे शक्य झाले त्यामुळे सहकार्य केलेल्या सर्वांचे आभार मानते तसेच माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी प्रचाराचे अतिशय चांगले नियोजन केले होते.

आगामी निवडणुकीत अक्कलकोट मध्ये काँग्रेसचे सिद्धाराम म्हेत्रे हेच आमदार होणार असून सोलापूर जिल्हा भाजपमुक्त करणार असल्याचे सांगितले.सोलापूर जिल्ह्यातील प्रलंबित विकास कामे मार्गी लावण्यासाठी काम करणार असल्याची ग्वाही खासदार प्रणिती शिंदे यांनी यावेळी दिली.

