ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक तथा ख्यातनाम लेखिका कै.रोहिणी गवाणकर यांना उपसभापती, महाराष्ट्र विधानपरिषद, डॉ.नीलम गोऱ्हे यांनी वाहिली श्रद्धांजली
पुणे/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१२/०६/२०२४- स्वातंत्र्यासाठी पत्री सरकारच्या आंदोलनात भाग घेऊन गुप्त निरोप पोहचवण्याचे काम करणाऱ्या ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी व साहित्यिक कै. रोहिणी गवाणकर यांचे दु:खद निधन झाले. त्यांना डॉ.नीलम गोऱ्हे यांनी श्रद्धांजली वाहीली.
स्वातंत्र्य लढयात योगदान देणाऱ्या उषाबेन मेहता यांच्या बरोबरीने रोहिणी गवाणकर यांनी पत्री सरकारचे गुप्त निरोप पोहचवण्याचे काम केले होते व मुंबईतील विद्यार्थांचे आणि महिलांचे आंदोलन जिवंत ठेवले.14 वर्षाचे असताना त्यांनी स्वातंत्र्य लढ्यात दिलेल्या अमुल्य योगदानाबद्दल त्यांना श्रद्धांजली डॉ.निलम गोऱ्हे यांनी वाहिली व तसा शोक संदेश त्यांची मुलगी श्रीमती अंजली भागवत यांना पाठविला आहे.
Discover more from Dnyan pravah news
Subscribe to get the latest posts sent to your email.