रक्तदान शिबिर पंढरपूर ब्लड बँक यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न
पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज- गेली 198 वर्षापासून ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली महाराष्ट्रातील सुवर्ण पिढी चंदूकाका सराफ ही व्यवसायाबरोबर सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम करत असते.त्या अनुषंगाने जागतिक रक्तदाता दिनानिमित्त पंढरपूर शाखेमध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी पंढरपूर शाखेतील ग्राहकांनी व कर्मचाऱ्यांनी रक्तदान करून सहकार्य केले.हे रक्तदान शिबिर पंढरपूर ब्लड बँक यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंढरपूर येथील शतकवीर रक्तदाते रविंद्र भिंगे उपस्थित होते.रविंद्र भिंगे यांनी तब्बल 116 वेळा रक्तदान करून आपली सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम केले.या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून पंढरपूर ब्लड बँकेचे चेअरमन डॉ.प्रसाद खाडीलकर, डॉ. संभाजी पाचकवडे ,डॉ.राजेश फडे ,डॉ. नीरज शहा ,अरुण नागटिळक उपस्थित होते.या शिबिराचे कामकाज पंढरपूर ब्लड बँकेचे संतोष उपाध्ये यांनी पाहिले.या रक्तदान शिबिराचे वैशिष्ट्य म्हणजे महिला कर्मचार्यांनीही मोठ्या संख्येने रक्तदान केले.

या शिबिरास पंढरपूर शाखेचे व्यवस्थापक दिपक चव्हाण,बंडू गोफणे,ऑपरेशन मॅनेजर अनिल वठारे , फ्लोअर मॅनेजर संदीप पवार आदी उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रणजित सावळे, व व्यवस्थापन प्रवीण काळे,विनायक पवार ,सागर गोटे,गणेश पाटील, श्री गवळी यांच्यासह सर्व कर्मचार्यांनी केले.


