वसुली न झाल्याने नगरपालिकेची आर्थिक स्थिती अडचणीत

वसुली न झाल्याने नगरपालिकेची आर्थिक स्थिती अडचणीत The financial condition of the municipality is in trouble due to non-recovery

पंढरपूर – पंढरपूर शहरातील सर्व नागरिकांना कळविण्यात येते की ,गेल्या दोन वर्षापासून कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे व्यवसाय बंद असल्याने नागरिकांनी नगरपालिकेचा कर भरलेला नाही. कर हे नगरपरिषदेचे मुख्य आर्थिक स्रोत असून सध्या शहरातील व्यापारी,नागरिकांकडे 25 कोटी , झोपडपट्टीधारक यांचेकडे 5 कोटी कर वसुली येणे बाकी आहे.सदर वसुली न झाल्याने नगरपालिकेची आर्थिक स्थिती अडचणीत आली आहे. सध्या शहरात असणाऱ्या 146 बोअरवरील विद्युत मोटार ,रोडलाईट,मल शुद्धीकरण केंद्र,जल शुद्धीकरण केंद्र येथील दरमहा सुमारे 48 लाख रुपये वीज बिल नगरपरिषदेला विद्युत महामंडळा कडे भरावे लागते .सध्या कर रूपाने मिळणारे उत्पन्नात घट झाल्याने विद्युत बिल भरणे अशक्य झाले आहे.त्यामुळे शहरातील नागरिकांना किमान दररोज पाणीपुरवठा होण्याच्या दृष्टीने जलशुद्धी करण केंद्र व मलशुद्धीकरण केंद्र चालू राहणे आवश्यक असलेने त्याचे वीज बिल सध्या अदा करण्याबाबत नगर परिषद प्रयत्नशील आहे .आज महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ यांनी शहरातील बोअरचे वीज कनेक्शन बंद केलेली आहेत. तरी नागरिकांनी सध्या मिळणारे नगरपरिषदचे नळाचे पाणी काटकसरीने वापरावे व नगरपरिषदेस सहकार्य करावे अशी विनंती पंढरपूर नगरपरिषदेच्यावतीने नगराध्यक्षा सौ साधनाताई नागेश भोसले, उपनगराध्यक्ष सौ श्वेता नीलराज डोंबे,पाणी पुरवठा सभापती संजय निंबाळकर, पंढरपूर नगरपरिषद मुख्याधिकारी अरविंद माळी यांच्यावतीने करण्यात आली आहे.

   मात्र रोड लाईट या संध्याकाळी उजेड असतानाच सुरु करण्यात आलेल्या असतात आणि सकाळी उठल्यानंतरही बराच वेळ चालू असतात. या रोडवरील लाईट चालू बंदचे नियोजन  व्यवस्थित करण्यात आल्यास बरीच वीज बचत होणार आहे.त्यामुळे तातडीने कारवाई करावी अशी मागणी नागरिकांतून होत आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: