राज्यातल्या शाळा पुन्हा सुरु होणार, फायनल निर्णय मुख्यमंत्री घेणार : राजेश टोपे


जालना : राज्यातल्या बंद करण्यात आलेल्या शाळा पुन्हा सुरु करण्याचे संकेत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले आहेत. ज्या ठिकाणी कोरोना रुग्णसंख्या कमी आहे, तिथे अपडेट घेऊन शाळा सुरु करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिले.

राज्यात गेल्या तीन आठवड्यांपासून कोरोना आणि ओमायक्रॉनची संख्या वाढते आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यातील शाळा पुन्हा एकदा बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. मात्र राज्यातील काही जिल्ह्यांत कोरोना रुग्णसंख्या नगण्य असताना शाळा बंद करणे, विद्यार्थ्यांचं अगोदरच मोठं शैक्षणिक नुकसान झालेलं असताना शाळेला टाळं लावणं योग्य नसल्याचं मत अनेक पालक व्यक्त करत आहेत. त्यानंतर आता राज्य सरकारने एक पाऊल मागे घेण्याची तयारी दाखवली आहे.

कोरोनाच्या वाढणाऱ्या केसेस पाहून राज्यातल्या शाळा बंद करण्यात आल्या आहेत. पंधरा दिवसांनंतर परिस्थितीचा आढावा घेऊन ज्या ठिकाणी रुग्ण नाहीत तिथे पन्नास टक्क्यांच्या क्षमतेने शाळा पुन्हा सुरु कराव्यात, अशी मागणी होत आहे. त्यामुळे पंधरा दिवसांनंतर आढावा घेऊन यावर पुनर्विचार करण्यात येईल आणि त्यानंतर मुख्यमंत्री यावर निर्णय घेतील, असं टोपे यांनी म्हटलंय.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: