सतत एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी, पोलिसांना अनेक तास हुलकावणी, अखेर भामट्याला पकडलाच!


उस्मानाबाद : परंडा तालुक्यातील आवारपिंपरी परिसरातील चौधरी वस्ती येथील एका अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेल्या प्रकरणातील आरोपी सावन पवार याला परंडा पोलिसांच्या पथकाने सायबरसेलच्या मदतीने अथक परिश्रम घेऊन दोन दिवसात यवतमाळ जिल्ह्यातील वर्ध्यातून अटक केली आहे.

अल्पवयीन मुलीच्या अपहरणप्रकरणी परंडा पोलीस स्टेशन येथे दि. ११ जानेवारी रोजी अपहरणाचा गुन्हा दाखल झाला होता. प्रकरणाचे गांभीर्य ओळखुन या प्रकरणातील पीडितेचा आणि आरोपीचा शोध लावण्यासाठी परंडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनिल गिड्डे यांनी पोना. रमेश क्षिरसागर व पोना. शेवाळे यांचे पथक तयार करून या प्रकरणाचा जलदगतीने तपास करण्यासाठी त्यांना महत्वाच्या सूचना देऊन पीडितेच्या व आरोपीच्या शोधासाठी पाठविण्यात आले.

आरोपींची प्राथमिक माहिती काढली असता आरोपी पीडित मुलीसह‌ यवतमाळ जिल्ह्यात असल्याची पोलिस निरीक्षक सुनिल गिड्डे यांना माहिती मिळाली. माहितीच्या अनुषंगाने यवतमाळ येथे तपास पथक रवाना करण्यात आले. आरोपीच्या लोकेशन वरून पोना. रमेश क्षिरसागर आणि पोना. शेवाळे यांनी यवतमाळ येथे पीडितेचा व आरोपीचा शोध घेण्यासाठी अनेक ठिकाणी झाडाझडती घेतली. मात्र आरोपी सारखेच ठिकाणं बदलत असल्याने हाती लागत नसल्याची माहिती पोलीस निरीक्षक सुनिल गिड्डे यांना पथकाकडून वेळोवेळी दिली जात होती.

प्रकरण गंभीर असल्याने आरोपीच्या शोधासाठी पोलिस अधिक्षक निवा जैन, अप्पर पोलिस अधिक्षक उपविभागीय पोलिस आधिकारी डंबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरिक्षक सुनिल गिड्डे यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलिस निरिक्षक एकशिंगे यांच्या संपर्कात राहून तपास पथकाचे पोलिस नाईक रमेश क्षिरसागर व पोना शेवाळे यांनी सायबर सेलच्या मदतीने आरोपीच्या लोकेशन वरून त्याच्या सततच्या हालचाली जाणून घेतल्या जात होत्या.

दोन दिवस पोलिसांना हुलकावणी देणाऱ्या सावन सुदाम पवार या आरोपीस तिसऱ्या दिवशी वर्धा शहरातून अटक करण्यात पोलिस पथकाला सायबर सेलच्या मदतीने यश मिळाले. आरोपीच्या तपास कामी परंडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनिल गिड्डे, सहाय्यक पोनि एकशिगे, सहायक पोनि हिंगे, सहाय्यक पोनि ससाने, पोना विशाल खोसे, महिला पोना पायाळ, पोकॉ कळसाईन यांचे पथकाला वेळोवेळी मार्गदर्शन मिळाल्यामुळे ६०० किमी अंतरावर असणाऱ्या या प्रकरणातील आरोपी व पीडित मुलीला ताब्यात घेण्यात पोलिस पथकाला यश मिळाले.

या तपास पथकातील प्रमुख पोलिस नाईक रमेश क्षिरसागर हे मुंबई पोलिसात कार्यरत असताना त्यांनी अनेक मिसींग, अपहरण प्रकरणचा तपास लावून आरोपींना परराज्यातून अटक केलेली आहे.

परंडा पोलिस ठाण्यातील कर्मचारी रमेश क्षिरसागर व शेवाळे यांनी यवतमाळ जिल्ह्यातील वर्धा येथे जाऊन आरोपींचा शोध घेऊन त्यास ताब्यात घेतले. पीडित अल्पवयीन मुलीची सुटका करण्यात आली असून आरोपी विरोधात गुन्हा दाखल करून अधिक तपास करण्यात येत आहे.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: