पंढरपुरात क्रेडाई गृह उत्सव २०२६ चे भव्य आयोजन : आता माझ्या शहरात होणार माझं घर
धार्मिक पर्यटन, शिक्षण व उद्योगासाठी ओळखल्या जाणाऱ्या पंढरपुरात घर खरेदीसाठी एकाच छताखाली सुवर्णसंधी
पंढरपूर येथे १६ ते १८ जानेवारी २०२६ दरम्यान क्रेडाई पंढरपूरतर्फे गृह उत्सव २०२६ चे आयोजन.फ्लॅट्स,बंगले, रो- हाऊसेस,होम लोन व बिल्डिंग मटेरियल्सचे भव्य प्रदर्शन. प्रवेश विनामूल्य.
पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज : धार्मिक पर्यटन,शिक्षण,उद्योग आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात वेगाने प्रगती करणाऱ्या पंढरपूर शहरात क्रेडाई पंढरपूर तर्फे गृह उत्सव २०२६ या भव्य रिअल इस्टेट प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. दि.१६,१७ आणि १८ जानेवारी २०२६ दरम्यान सकाळी १० ते रात्री ९ या वेळेत रेल्वे ग्राउंड पंढरपूर येथे हा गृह उत्सव भरवण्यात येणार आहे.
या गृह उत्सवाचे उद्घाटन सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा ग्राम विकास मंत्री जयकुमार गोरे,प्रफुल्ल तावरे अध्यक्ष क्रेडाई महाराष्ट्र,आशिष पोखरणा सचिव क्रेडाई महाराष्ट्र यांच्या हस्ते होणार असून या कार्यक्रमाला आमदार समाधान आवताडे,आमदार प्रशांत परिचारक, आमदार अभिजीत पाटील,पंढरपूरच्या नगराध्यक्षा सौ.प्रणिताताई भालके,युवा नेते प्रणव परिचारक आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

या प्रदर्शनात फ्लॅट्स,बंगले,रो-हाऊसेस, ओपन प्लॉट्स तसेच होम लोन,बिल्डिंग मटेरियल सप्लायर्स यांचे भव्य प्रदर्शन आणि विक्री होणार आहे.नागरिकांना एकाच ठिकाणी विविध गृहप्रकल्पांची माहिती मिळणार असून, आकर्षक ऑफर्स आणि सवलतींचा लाभ घेता येणार आहे.
गृह उत्सवात महिलांसाठी विशेष उपक्रम, लकी ड्रॉ तसेच नामांकित बँकांकडून तात्काळ गृहकर्ज मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध असणार आहे. विशेष म्हणजे या प्रदर्शनासाठी प्रवेश पूर्णपणे विनामूल्य ठेवण्यात आला आहे.
पंढरपूर शहरातील नागरिकांसह परिसरातील गृहखरेदीस इच्छुक नागरिकांसाठी हा गृह उत्सव म्हणजे स्वप्नातील घर साकार करण्याची सुवर्णसंधी ठरणार आहे,असे मत आयोजकांच्यावतीने अध्यक्ष आशिष शहा,उपाध्यक्ष शार्दूल नलबिलवार,सचिव शशिकांत सुतार,खजिनदार महेश आराध्ये,सह सचिव शरदचंद्र कुलकर्णी, पी.आर.ओ. मिलिंद वाघ आणि क्रेडाई सभासद पंढरपूर यांनी व्यक्त केले आहे.
या कार्यक्रमाची ठळक माहिती
दिनांक : १६,१७,१८ जानेवारी २०२६
वेळ : सकाळी १० ते रात्री ९
स्थळ : रेल्वे ग्राउंड, पंढरपूर , प्रवेश : विनामूल्य
संपर्कासाठी : 7387100355




