खूशखबर ; SBI आणि HDFC ने ठेवींवरील व्याजदर वाढवले, जाणून घ्या नवे दर


नवी दिल्ली : खाजगी क्षेत्रातील सर्वात मोठी बँक एचडीएफसी बँकेनंतर आता स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) फिक्स डिपॉझिट (FD) व्याजदरात वाढ केली आहे. एसबीआयच्या संकेतस्थळानुसार, बँकेने एक वर्ष ते २ वर्षांपेक्षा कमी कालावधीसाठी २ कोटी रुपयांपेक्षा कमी एफडीचा व्याजदर १० बेसिस पॉईंटने वाढवला आहे. या एफडीवर आता १५ जानेवारी २०२२ पासून ५.१ टक्के व्याज मिळेल. तसेच ज्येष्ठ नागरिक एफडीवर व्याज दर ५.६ टक्के मिळेल.

PNB ग्राहकांनो इकडे लक्ष द्या; १५ जानेवारीपासून या सेवांसाठी द्यावे लागणार जास्त पैसे
अशा परिस्थितीत, जर तुम्हाला एसबीआयमध्ये १ वर्ष ते २ वर्षांपेक्षा कमी कालावधीची एफडी उघडायची असेल, तर ही तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण तुम्हाला जास्त व्याज मिळणार आहे. नवीन व्याजदर १५ जानेवारी २०२२ पासून लागू झाला आहे. यापूर्वी ८ जानेवारी २०२१ रोजी एफडीचे नवीन व्याजदर लागू करण्यात आले होते. जुने व्याजदर १ वर्ष ते २ वर्षांपेक्षा कमी कालावधीतील एफडी वगळता इतर सर्व एफडीवर लागू आहेत.

करोना बाधितांना तात्काळ नवी विमा पॉलिसी नाहीच; हे आहे त्यामागचे कारण, जाणून घ्या
एसबीआय एफडीवरील व्याज दर
७ ते ४५ दिवसांच्या एफडीवर २.९० टक्के, ४६ ते १७९ दिवसांच्या एफडीवर ३.९० टक्के, १८० ते २१० दिवसांच्या एफडीवर ४.४० टक्के, २११ दिवस ते एक वर्षापेक्षा कमी कालावधीच्या एफडीवर ४.४० टक्के, १ वर्ष ते २ वर्षापेक्षा कमी कालावधीसाठी ५.१ टक्के, दोन वर्ष ते ३ वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या एफडीवर ५.१ टक्के, ३ वर्ष ते ५ वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या एफडीवर ५.३ टक्के टक्केवारी आणि ५ वर्षे ते १० वर्षे कालावधीच्या एफडीवर ५.४ टक्के व्याज दर लागू होतो.

आयपीओ: शेअर बाजारातील नव्यख्या गुंतवणूकदारांसाठी गुंतवणुकीचे आदर्श साधन
दरम्यान, ज्येष्ठ नागरिकांसाठी हा व्याजदर अनुक्रमे ३.४ टक्के, ४.४ टक्के, ४.९ टक्के, ५.६ टक्के (वाढवलेला), ५.६ टक्के, ५.८ टक्के आणि ६.२ टक्के आहे. अलीकडेच खासगी क्षेत्रातील एचडीएफसी बँकेनेही आपल्या निश्चित कालावधीच्या एफडीवरील व्याजदरात वाढ केली आहे.
अशाप्रकारच्या २० हून अधिक क्षेत्रातली सखोल अभ्यासपूर्ण माहितीसह एक्सक्लुझिव्ह इकाॅनाॅमिक टाईम्स स्टोरीज.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: