मुुंबईच्या क्रिकेटपटूने ‘पुष्पा’च्या गाण्यावर लावले ठुमके; व्हिडिओ व्हायरल
सूर्यकुमार आणि ईशान दोघेही या गाण्यातील काही स्टेप्स करताना दिसतात. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या या चित्रपटाची सध्या सगळीकडे जोरदार चर्चा होत आहे. हा व्हिडिओ शेअर करताना सूर्यकुमारने लिहिले की, “माझ्या पुष्पासोबत.”
जडेजाही पुष्पाचा चाहता
या चित्रपटाची नकल करणारा सूर्यकुमार हा एकटा क्रिकेटपटू नाही. त्याच्याआधी अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा आणि डावखुरा सलामीवीर शिखर धवन यांनीही अल्लू अर्जुनची नकल केली आहे. या चित्रपटातील अल्लू अर्जुनचा लूक जडेजाने कॉपी केला होता आणि त्याचा फोटोही सोशल मीडियात व्हायरल झाला होता.
वाचा- विराटने अहंकार सोडावा, एक फलंदाज म्हणून त्याला…; विश्वचषक विजेत्या कर्णधाराचे खळबळजनक वक्तव्य
एकदिवसीय मालिका जिंकण्याचे लक्ष्य
कसोटी मालिकेत भारत विजयाचा प्रबळ दावेदार मानला जात होता, पण संघाला दुसऱ्या आणि तिसऱ्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. दुसरीकडे एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदावरून हटविल्यानंतर विराट कोहलीने कसोटी संघाच्या कर्णधारपदाचाही राजीनामा दिला आहे. त्यामुळे नव्या कर्णधाराच्या नेतृत्वाखाली एकदिवसीय मालिका जिंकण्याचे भारतीय संघाचे लक्ष्य असणार आहे.
वाचा- विराटने कर्णधारपद सोडल्यानंतर आली रोहित शर्माची प्रतिक्रिया; शेअर केला हा फोटो
दरम्यान, दुखापतीमुळे रोहित शर्मा या दौऱ्यावर येऊ शकला नाही, त्यामुळे के.एल. राहुल एकदिवसीय संघाचे नेतृत्व करणार आहे. जोहान्सबर्ग येथे झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यातही राहुलने संघाचे नेतृत्व केले होते. भारताने २०१८ मध्ये दक्षिण आफ्रिकेचा त्यांच्या घरच्या मैदानावर एकदिवसीय मालिकेत पराभव केला होता.