निफ्टी५० पेक्षा स्मॉलकॅपची सरस कामगिरी, बाजाराचा सप्ताहारंभी सकारात्मक प्रवास


हायलाइट्स:

  • सोमवारी निफ्टी५० इंडेक्स ०.२९% म्हणजेच ५२.३५ अंकांनी वाढून बंद झाला.
  • मागील बंदच्या तुलनेत निर्देशांक ०.११% कमी होऊन १८,२३५.६५ वर सुरू झाला.
  • दिवसाचा उच्चांक १८,३२१.५५ होता.

मुंबई – सोमवारच्या व्यवहार सत्रात भारतीय भांडवली बाजाराचे प्रमुख निर्देशांक सकारात्मक स्तरावर बंद झाले. सोमवारी निफ्टी५० इंडेक्स ०.२९% म्हणजेच ५२.३५ अंकांनी वाढून बंद झाला. मागील बंदच्या तुलनेत निर्देशांक ०.११% कमी होऊन १८,२३५.६५ वर सुरू झाला. दिवसाचा उच्चांक १८,३२१.५५ होता. तर त्याचा दिवसाचा तळ १८,२२८.७५ राहिला. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लिमिटेड, टाटा मोटर्स लिमिटेड, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड, ग्रासीम लिमिटेड आणि जेएसडब्ल्यू स्टील लिमिटेड हे निफ्टी५० ला वाढण्यास प्रवृत्त ठरले. सोमवारच्या व्यवहारात इंडेक्स वाढीत त्यांचे योगदान ६६.९१% दिले.

दोलायमान व्यवहारातही या टॅप१० स्मॉलकॅप स्टॉक्सची साप्ताहिक तसेच वार्षिक उच्चांक कामगिरी
बहुतांश क्षेत्रीय निर्देशांक सकारात्मक पातळीवर बंद झाले. निफ्टी स्मॉलकॅप२५० मध्ये उत्तम कामगिरी करणाऱ्यांपैकी एक ठरला. त्यात ०.४६% म्हणजेच ४७.८५ अंकांनी वाढला. हाच निर्देशांक मागील बंदच्या तुलनेत ०.३९%ने वाढून १०,४६५ वर सुरू झाला. निफ्टी स्मॉलकॅप२५० सह निफ्टी पीएसयू, ऑटो, निफ्टी रिएल्टी, निफ्टी एफएमसीजी आणि निफ्टी ऑइल अँड गॅस सारख्या क्षेत्रीय निर्देशांकांनी सर्वाधिक वाढ नोंदविली.

अशा प्रकारची आणखी सखोल माहिती हवी असल्यास सबस्क्राईब करा दलाल स्ट्रीट इन्व्हेस्टमेंट जर्नल-भारतातील पहिल्या क्रमांकाचे इक्विटी रिसर्च आणि गुंतवणूक मॅगझीन
पुढील तक्त्यात सोमवारी, १७ जानेवारी २०२२ रोजी टॉप१० स्मॉलकॅपमधील शेअर मूल्याचे चित्रण दिले आहे –

कंपनीचे नाव खुला उच्चांक नीचांक बंद भाव बदल(रु.) वाढ(%)
आलोक इंडस्ट्रीज ३०.३० ३५.८० ३०.१५ ३४.०० ३.९५ १३.१४
एमएमटीसी ४५.०० ४९.८० ४४.८५ ४८.९५ ४.१५ ९.२६
जिंदाल सॉ लि १०४.६५ ११४.४० १०४.१५ ११२.५० ८.४५ ८.१२
ईआयएच लि १३३.४० १४५.६० १३३.४० १४४.९५ १०.३० ७.६५
गुजरात अंबुजा एक्सपोर्ट्स लि १७१.०० १८३.५० १७०.३० १८३.२० १२.७५ ७.४८
केपीआयटी टेक्नॉलॉजीज लि ६८७.६० ७३२.०० ६८६.५० ७३२.०० ४८.१५ ७.०४
प्राज इंडस्ट्रीज लि ४२४.७० ४४२.०० ४१९.०० ४२९.३० २७.४५ ६.८३
जेके पेपर लि २१८.०० २३०.३० २१६.०० २२६.७० १४.३५ ६.७६
इंटेलेक्ट डिझाईन अरेना लि ७४९.८० ८०४.२० ७४८.५५ ७९६.०० ४८.९५ ६.५५
एसआयएस लि ४३७.०० ४६७.९५ ४३७.०० ४६६.९५ २६.९० ६.११

Disclaimer : This above is third party content and TIL hereby disclaims any and all warranties, express or implied, relating to the same. TIL does not guarantee, vouch for or endorse any of the above content or its accuracy nor is responsible for it in any manner whatsoever. The content does not constitute any investment advice or solicitation of any kind. Users are advised to check with certified experts before taking any investment decision and take all steps necessary to ascertain that any information and content provided is correct, updated and verifiedSource link

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: