General news

द.ह.कवठेकर प्रशालेच्या अक्षय मोरे ची सहाय्यक संशोधक अधिकारीपदी नियुक्ती

द.ह.कवठेकर प्रशालेच्या अक्षय मोरे ची सहाय्यक संशोधक अधिकारीपदी नियुक्ती

पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१०/०१/२०२४: द.ह.कवठेकर प्रशालेचा माजी विद्यार्थी अक्षय तानाजी मोरे यांची सरळ सेवा भरती मधून महाराष्ट्र शासनाच्या अर्थ व नियोजन मंत्रालयाच्या सहाय्यक संशोधक अधिकारी या पदावर नियुक्ती झाली आहे .

त्याबद्दल प्रशालेच्या वतीने मुख्याध्यापक व्ही.एम.कुलकर्णी सर यांनी अक्षय मोरे याचा सत्कार केला व त्याच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी अक्षय मोरे यांनी प्रशालेतील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. अक्षय मोरे हे सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँक शाखा पंढरपूरचे बँक इन्स्पेक्टर तानाजी मोरे यांचे चिरंजीव असून प्रथमपासून प्रशासकीय सेवेत जाण्याचे त्यांचे स्वप्न होते ते आज पूर्ण झाले. दहावीला 95 टक्के गुण प्राप्त केलेल्या अक्षय याने कला शाखेत प्रवेश घेतला व फर्ग्युसन कॉलेज पुणे येथून एम.ए.अर्थशास्त्र ही पदवी संपादन केली.भविष्यात जिल्हाधिकारी बनण्याचे अक्षय चे स्वप्न लवकरच साकार व्हावे यासाठी सर्वांनी शुभेच्छा दिल्या.

यावेळी प्रशालेचे ज्येष्ठ शिक्षक एस.एम. कुलकर्णी सर यांनी अक्षयच्या प्रवासाची ओळख करून दिली.

या कार्यक्रमास प्रशालेचे उपमुख्याध्यापक आर.जी.केसकर सर, ज्येष्ठ पर्यवेक्षक एम. आर. मुंडे सर,आर एस कुलकर्णी सर,जी एस पवार सर, समीर दिवाण सर,एस एम कुलकर्णी सर, श्री.शेलार सर यांच्यासह शिक्षक बंधू भगिनी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *