अवैध वाळू वाहतुकीवर महसूल प्रशासनाची कारवाई मात्र यात सातत्य आवश्यक

अवैध वाळू वाहतुकीवर महसूल प्रशासनाची कारवाई
                  
पंढरपूर ,दि.27:- अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूकी विरोधात पंढरपूरच्या महसूल विभागाने धडक मोहीम हाती घेतली आहे. तालुक्यात महसूल विभागाच्या भरारी पथकाव्दारे पंढरपूर येथील चंद्रभागा  नदीपात्रात वाळू चोरीसाठी वापरण्यात येणारे 4 तराफे नष्ट केले तर शिरढोण येथे वाळू उपसा करत असताना एक जेसीबी नष्ट करण्यात आला असल्याची माहिती तहसिलदार सचिन लंगुटे  यांनी दिली.


ADVERTIISEMENT
-----------------------------------------------------


पंढरपूर तालुक्यातील अवैध गौण खनिज उत्खनन रोखण्यासह वाळूची अवैध वाहतूक करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यासाठी पंढरपूर विभागाचे प्रांताधिकारी सचिन इथापे व तहसिलदार सचिन लंगुटे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

पंढरपूर येथील चंद्रभागा नदी पात्रात अवैध वाळू वाहतुकीसाठी वापरण्यात येणारे सुमारे दोन लाख किमतीचे 4 तराफे पुर्णपणे नष्ट करण्यात आले असून कृष्णा नाना नेहतराव यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच शिरढोण ता.पंढरपूर येथून नदीपात्रालगत वाळू चोरी करत असताना एक जेसीबी पकडून तो शासकीय धान्य गोदाम येथे जमा करण्यात आला.

त्याचबरोबर पंढरपुर येथील गाढवावरून वाळू चोरी करणाऱ्या व्यक्तींविरुद्ध चॅप्टर केस ची कारवाई प्रस्तावित करण्यात आली असल्याचे तहसिलदार सचिन लंगुटे यांनी सांगितले.

या भरारी पथकात मंडलाधिकारी विजय शिवशरण, तलाठी अमर पाटील, प्रमोद खंडागळे, श्रीकांत कदम, महेश कुमार सावंत,गणेश पिसे,प्रशांत शिंदे,वाहन चालक नितीन काळे तसेच पंढरपूर शहर पोलीस स्टेशन चे कर्मचारी सहभागी होते.

अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूकी विरोधात पंढरपूरच्या महसूल विभागाने धडक मोहीम हाती घेतली आहे मात्र यात सातत्य असणे आवश्यक आहे अशी चर्चा नागरिकांमधून सुरू आहे.


Discover more from Dnyan prawah news

Subscribe to get the latest posts sent to your email.


ADVERTIISEMENT
-----------------------------------------------------

Leave a Reply

Discover more from Dnyan prawah news

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading