शासनाने सुरु केलेली माझी लाडकी बहीण ही योजना गावोगावी राबविणार : समाधान काळे

शासनाने सुरु केलेली माझी लाडकी बहीण ही योजना गावोगावी राबविणार : समाधान काळे


ADVERTIISEMENT
-----------------------------------------------------


पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज ,दि.०१/०७/२०२४ : नुकतेच राज्य शासनाचेवतीने राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माझी लाडकी बहीण ही जाहीर केलेली योजना गावोगावी राबवून जास्तीत जास्त महिलांना लाभ मिळवून देण्यासाठी तालुका पातळीवर राष्ट्रवादी युवक काँग्रेस व युवा गर्जना यांच्या माध्यमातून प्रयत्न करणार असल्याचे महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष समाधान काळे यांनी सांगीतले.

गावं व तालुका पातळीवर ही योजना दोन्ही संघटनेच्या माध्यमातून महिलांना योजने साठी लागणारे आवश्यक कागदपत्रे महसुल विभागाकडून सहज उपलब्ध होणेकरीता पक्षाचे व संघटनेचे पदाधिकारी व युवक कार्यकर्ते गांवोगावी सक्रिय होणार असून जास्तीत जास्त लाभार्थींनी याचा लाभ कसा होईल यासाठी प्रयत्न केले जातील. महिला लाभार्थी ही 21 ते 60 वयोगटातील विधवा, विवाहीत,घटस्फोटीत, परितक्त्या व निराधार महिलांना या योजनेचा लाभ मिळणार असल्याचे काळे यांनी सांगितले.


Discover more from Dnyan prawah news

Subscribe to get the latest posts sent to your email.


ADVERTIISEMENT
-----------------------------------------------------

Leave a Reply

Discover more from Dnyan prawah news

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading