डॉक्टर्स डे चे निमित्ताने आमदार समाधान आवताडे यांनी साधला डॉक्टरांशी संवाद

डॉक्टर्स असोसिएशनच्यावतीने आमदार समाधान आवताडे यांचा त्यांची विधानसभा तालिका अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल केला सत्कार


ADVERTIISEMENT
-----------------------------------------------------


माजी सभापती सोमनाथ आवताडे स्वागत आणि प्रास्ताविक करताना

मंगळवेढा/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.३०/०६/२०२४ – आरोग्य सेवेच्या माध्यमातून जनतेची सेवा करत असताना वैद्यकीय क्षेत्रात येणाऱ्या सामाजिक आणि प्रशासकीय अडचणी मोठ्या प्रमाणावर आहेत.

चेअरमन संजय आवताडे, डॉ आर एम जाधव, डॉ टकले, डॉ बोधले

१ जुलै डॉक्टर्स डे चे निमित्ताने पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा मतदार संघातील आरोग्य क्षेत्रात येणाऱ्या समस्या व इतर समस्यांची जाणीव ठेवून आरोग्य व इतर काही गोष्टींबाबत संवाद साधण्यासाठी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांनी रविवार दि. ३०/०६/२०२४ रोजी रात्री सहपरिवार संवाद व स्नेहभोजनाच्या कार्यक्रमाचे आवताडे फार्म हाऊस मंगळवेढा येथे आयोजन केले होते.

आ समाधान आवताडे, डॉ जमदाडे, डॉ किशोर बागडे, डॉ मनोज भायगुडे

आमदार समाधान आवताडे यांनी आलेल्या सर्व डॉक्टरांशी संवाद साधत वैद्यकीय क्षेत्रात येणाऱ्या विविध प्रकारच्या अडचणींची चर्चा करून त्या सोडविण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले.यात प्रामुख्याने वैद्यकीय कचरा biomedical waste या प्रश्नावर आमदार समाधान आवताडे यांचे लक्ष वेधल्यानंतर त्यांनी तो प्रश्न तातडीने सोडविणार असल्याचे सांगितले.

आ.समाधान आवताडे,डॉ मनोज गांधी, डॉ राजेश फडे,डॉ अनुप फडे,डॉ सपना फडे

पंढरपूर येथे प्रत्येक वारीच्या वेळी अनेक ठिकाणी बॅरॅकेडिंग टाकून रस्ते बंद केलेले असतात मात्र यामुळे इमरजन्सी रुग्णांना तपासणीसाठी जाताना भूलतज्ज्ञ आणि इतर डॉक्टर्संना वाटेत अडविले जाते त्यामुळे रुग्णाला आणि डॉक्टरांनाही नाहक त्रास सहन करावा लागतो त्यासाठी कायमस्वरूपी काही उपाययोजना करण्याच्या आवश्यकता आहे त्यासाठीही संबंधित प्रशासनाशी बोलून तो प्रश्न सोडविणार आहे असे आमदार समाधान आवताडे म्हणाले.

आ.समाधान आवताडे ,संजय आवताडे, डॉ कुंभारे यांच्यासह मंगळवेढा येथील डॉ

पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील डॉक्टर मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती. यामध्ये आयएमए,निमा, होमिओपॅथी मेडिकल असोसिएशन,डेन्टल असोसिएशनचे पदाधिकारी आणि सभासद, पंढरपूर  मंगळवेढा तालुक्यातील आरोग्य अधिकारी उपस्थित होते. सर्व डॉक्टर्स असोसिएशन च्यावतीने आमदार समाधान आवताडे यांचा त्यांची विधानसभा तालिका अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.

यावेळी आवताडे शुगर्स & डिस्टिलरीज साखर कारखान्याचे चेअरमन संजय आवताडे,कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सोमनाथ आवताडे, मंगळवेढा पंचायत समितीचे माजी सभापती प्रदीप खांडेकर, मंगळवेढ्याचे माजी नगराध्यक्ष चंद्रकांत पडवळे उपस्थित होते.

हा संवाद कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी डी बी बळवंतराव, रावसाहेब फटे,प्रकाश रोहीटे, अतुल शिंदे,प्रशांत घोंगडे,सुरेश सांवजी, भगवान चव्हाण आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी प्रयत्न केले.


Discover more from Dnyan prawah news

Subscribe to get the latest posts sent to your email.


ADVERTIISEMENT
-----------------------------------------------------

Leave a Reply

Discover more from Dnyan prawah news

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading