अशा आधुनिक यंत्रणेमुळे वृक्षतोडीला आळा बसून पर्यावरणाचा समतोल राखला जाणार – जिल्हाप्रमुख धनंजय डिकोळे

कुर्डुवाडीत गॅसशव दाहिनीचे भुमी पुजन Bhumi Pujan of Gasshav Dahini in Kurduwadi

कुर्डुवाडी/ राहुल धोका – कुर्डुवाडी नगर परिषदेला जिल्हा वार्षिक योजनेच्या यंत्र सामग्री व नावीन्यपूर्ण योजनेमधून हिंदू स्मशानभूमीमध्ये गॅस शवदाहिनी व दहनशेड बांधकामासाठी १ कोटी ७ लाख रूपये मंजूर झाल्याची माहिती नगराध्यक्ष समीर मुलाणी यांनी दिली.

 राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या  माध्यमातून खास बाब म्हणून जिल्हयाचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे,आमदार संजयमामा शिंदे व खासदार राहुल शेवाळे यांच्या प्रयत्नाने हिंदू स्मशानभूमीमध्ये गॅस शवदाहिनी व दहनशेड बांधकामासाठी १ कोटी ७ लाख रुपये मंजूर झाले आहेत. 

    या कामासाठी प्रशासकीय,तांत्रिक निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून या कामाचे भुमीपूजन कुर्डुवाडीचे नगराध्यक्ष  समीर मुलाणी,शिवसेनेचे जिल्हा प्रमुख धनंजय डिकोळे, स्वाभिमानी पक्षाचे नेते संजय गोरे यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी नगरसेवक शिवसेनेचे गटनेते बबन बागल, नगरसेवक आनंद टोणपे,निवृत्ती गोरे,नगर परिषदेच्या अभियंता वैशाली मठपती ,आरपीआय चे चंद्रकांत वाघमारे,समद मुलाणी,मनोज  धायगुडे,बबलू वाल्मिकी,स्वप्नील गवळी,विशाल गोरे,बाळू जगधने,अस्लम शेख,ज्योतिबा लोखंडे

आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना जिल्हाप्रमुख धनंजय डिकोळे म्हणाले की,अशा आधुनिक यंत्रणेमुळे वृक्षतोडीला आळा बसून पर्यावरणाचा समतोल राखला जाणार आहे. म्हणून या यंत्र सामुग्रीची गरज होती ती  महाविकास आघाडीने उपलब्ध करून दिल्याबद्दल आम्ही सरकारला धन्यवाद देतो.

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: