पंढरपूर शहरात मांस,मटण विक्रीस मनाई

पंढरपूर शहरात मांस,मटण विक्रीस मनाई


ADVERTIISEMENT
-----------------------------------------------------


पंढरपूर,दि.06 :- आषाढी शुध्द एकादशी 17 जुलै 2024 रोजी असून, आषाढी यात्रा कालावधी दि.06 जुलै ते 21 जुलै आहे. या यात्रा कालावधीत शहरात श्री विठ्ठल- रुक्मिणी दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविक येतात. या वारी कालावधीमध्ये दि. 16 ते 20 जुलै 2024 पर्यंत पंढरपूर शहरातील मांस, मटण, मासे विक्री व प्राणी कत्तल यावर बंदी घालण्यात आल्याचे आदेश उपविभागीय अधिकारी सचिन इथापे यांनी निर्गमित केले आहेत.

शहरातील कायदा व सार्वजनीक सुव्यवस्था राखण्यासाठी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये दि.16 ते 20 जुलै 2024 या कालावधीत शहरात मांस, मटण, मासे विक्री व प्राणी कत्तल यावर बंदी घालण्यात आली आहे.


Discover more from Dnyan prawah news

Subscribe to get the latest posts sent to your email.


ADVERTIISEMENT
-----------------------------------------------------

Leave a Reply

Discover more from Dnyan prawah news

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading