राजकीय न्यूज

प्रणव परिचारक यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटण्याचा बहुमान

प्रणव परिचारक यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटण्याचा बहुमान प्राप्त

पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज – पंढरपूर मंगळवेढा तालुक्याचे युवा नेते प्रणव परिचारक यांनी नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.पंतप्रधान कार्यालयाकडून जिल्ह्यातील काही महत्त्वाच्या भेटींमध्ये प्रणव परिचारक यांना नरेंद्र मोदी यांना भेटण्याचा बहुमान प्राप्त झाला.

भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून पंढरपूर परिचारक दहा वर्षापासून सक्रिय कार्यरत आहे. जनसामान्यांचा सर्वसामान्य लोकांचा हक्काचा माणूस म्हणून परिचारक यांच्याकडे पाहिले जाते. भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यालयाच्या वतीने जिल्ह्यातील काही महत्त्वाच्या व्यक्तींना भेटी संदर्भात पंतप्रधान कार्यालयास विनंती करण्यात आली होती. प्रदेश कार्यालयांच्या विनंतीनुसार पंतप्रधान कार्यालयाकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जिल्ह्यातील कार्यकर्त्यांची भेट घेतली. यामध्ये प्रणव परिचारक यांचा समावेश होता.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रणव परिचारक यांनी भेट घेतली आणि आपण पंढरपूर येथून असल्याचे सांगितले .यावेळी सावळ्या विठुरायाचा उल्लेख आणि पंढरपूरबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जिव्हाळा व्यक्त केला.

जिल्ह्याचे आमदार प्रशांत परिचारक यांच्या नेतृत्वाखाली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याही भेटीचा योग आला. यावेळी सोलापूर जिल्ह्यातील सर्व आमदार खासदार माजी आमदार उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *