कॅन्सर डायग्नोस्टिक व्हॅनव्दारे होणार कर्करोग तपासणी

कॅन्सर डायग्नोस्टिक व्हॅनव्दारे होणार कर्करोग तपासणी

उपजिल्हा रुग्णालय पंढरपुर येथे बुधवारी येणार व्हॅन,नागरिकांनी लाभ घ्यावा : डॉ महेशकुमार सुडके

पंढरपूर,दि.29 :- कर्करोगाचे वाढते प्रमाण लक्षात घेता सुसज्य कॅन्सर डायग्नोस्टिक व्हॅनव्दारे तपासणी करण्यात येणार आहे. याकरीता जिल्हाशल्यचिकित्सक डॉ.सुहास माने,निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.श्रीकांत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली ही व्हॅन दि. 30 एप्रिल रोजी बुधवारी उपजिल्हा रुग्णालय पंढरपुर येथे येणार आहे. तरी या सेवेचा जास्तीत जास्त लोकांनी लाभ घ्यावा असे आवाहन उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ महेशकुमार सुडके यांनी केले आहे.

असंसर्गजन्य व्याधींमध्ये कर्करोगाचे वाढते प्रमाण लक्षात घेता दि.4 फेब्रुवारी रोजी जागतिक कर्करोग दिनाचे औचित्य साधून आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी कॅन्सर डायग्नोस्टिक व्हॅनचे उदघाटन केले आहे. या व्हॅनमध्ये प्रामुख्याने मुख कर्करोग,स्तन कर्करोग व गर्भाशय मुख कर्करोग या तीन प्रकारच्या कर्करोगांची तपासणी केली जाणार आहे. दि. 21 एप्रिल ते 20 मे या कालावधीमध्ये कॅन्सर डायग्नोस्टिक व्हॅन सोलापूर जिल्ह्यामध्ये दौरा करणार आहे.

ही व्हॅन कर्करोगाची तपासणी करण्यासाठी आवश्यक असलेल्या उपकरणांनी सुसज्ज आहे.यामध्ये मुख कर्करोगाच्या तपासणी साठी डेंटल चेअर व बायोप्सी घेण्यासाठीची आवश्यक उपकरणे तसेच गर्भाशय मुख कर्करोगाच्या तपासणीसाठी कोलपोस्कोप गायडेड बायोप्सी तसेच स्तन कर्करोग बायोप्सीसाठी आवश्यक असलेले उपकरणे उपलब्ध आहेत.

या कॅन्सर डायग्नोस्टिक व्हॅनचा मुख्य उद्देश असा आहे की, खेड्यापाड्यांमध्ये, गावांमध्ये राहणारे नागरिक जे त्यांच्या उच्च तपासणी साठी रुग्णालयांपर्यंत पोहोचू शकत नाही अशा लोकांना या सुसज्ज व्हॅन द्वारे सेवा देण्यात यावी हा आहे, असे डॉ महेशकुमार सुडके यांनी सांगितले.

Leave a Reply

Back To Top