स्वेरीमध्ये महाराष्ट्र दिन व कामगार दिन साजरा
पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०२ मे २०२५ – गोपाळपूर ता.पंढरपूर येथील स्वेरी तथा श्री.विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयूटमध्ये दि ०१ मे २०२५ रोजी महाराष्ट्र दिन व कामगार दिन साजरा करण्यात आला.
स्वेरीमध्ये स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग,पंढरपूर (ऑटोनॉमस) चे प्राचार्य डॉ.बी पी रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र दिन व कामगार दिन साजरा करण्यात आला. कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ.एम जी मणियार यांनी भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन करून ध्वजारोहण केले.राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीतानंतर प्रथम वर्ष अभियांत्रिकीचे विभाग प्रमुख डॉ.यशपाल खेडकर यांनी आजचा दिवस का साजरा करायचा हे सांगितले.

यावेळी स्वेरीज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग च्या उपप्राचार्या डॉ.मिनाक्षी पवार,विद्यार्थी अधिष्ठाता डॉ.महेश मठपती, शैक्षणिक अधिष्ठाता डॉ.एम पी ठाकरे,प्रशासन अधिष्ठाता डॉ.आर आर गिड्डे, मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे विभागप्रमुख डॉ.एस बी भोसले,कॉम्प्यूटर सायन्स अँड इंजिनिअरिंग च्या विभागप्रमुख डॉ.एस पी पवार, इंटर्नल क्वालिटी अशुरन्स सेलचे समन्वयक डॉ.एस एस वांगीकर,एम.बी.ए.चे विभाग प्रमुख डॉ. कमल गलानी तसेच सर्व अधिष्ठाता,स्वेरी अंतर्गत असलेल्या चारही महाविद्यालयांतील प्राध्यापक वर्ग आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.