हार्दिक पंड्यासाठी धोक्याचा इशारा; ‘हा’ खेळाडू टी-२० विश्वचषक संघात बसतो फिट


मुंबई: वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-२० मालिकेत व्यंकटेश अय्यरने ज्याप्रकारे कामगिरी केली, त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. भारताचा माजी सलामीवीर वसीम जाफरही अय्यरचा फॅन झाला आहे. व्यंकटेश अय्यरच्या सध्याच्या कामगिरीमुळे त्याला टी-२० विश्वचषक संघात जागा मिळायला हवी. हार्दिक पंड्याआधी अय्यरला संघात ठेवले पाहिजे, असे मत जाफरने व्यक्त केले आहे.

वाचा- रोहित सारखा कर्णधार होणे नाही, ऋतुराजसाठी मोठा त्याग करून नवा आदर्श घालून दिला!

वेस्ट इंडिजविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेदरम्यान व्यंकटेश अय्यरची अष्टपैलू खेळाडूची शैली बघायला मिळाली, यासाठीच त्याला संघात स्थान दिले होते. पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करताना त्याने जोरदार फलंदाजी केली. व्यंकटेशने तीन सामन्यांत एकूण ९२ धावा केल्या. यात २४ आणि ३५ धावांच्या नाबाद खेळीचा समावेश आहे. त्याचबरोबर शेवटच्या टी-२० सामन्यात त्याने दोन बळीही घेतले आहेत. यावरून व्यंकटेश अय्यर भारतीय संघात एका जबाबदार अष्टपैलू खेळाडूची भूमिका बजावू शकतो, हे दिसून येते.

वाचा- अरे हे काय झाले, विजयानंतर भारताला बसला धक्का; स्टार खेळाडूला दुखापत

वसीम जाफरच्या मते, यावेळी व्यंकटेश अय्यरने हार्दिक पंड्याला मागे टाकले आहे. ईएसपीएन क्रिकइन्फोवरील संभाषणादरम्यान वसीम म्हणाला की, या क्षणी माझ्या मते व्यंकटेश अय्यर हार्दिक पंड्यापेक्षा थोडा पुढे गेला आहे. कारण हार्दिक पंड्या गोलंदाजी करेल की नाही आणि त्याचा फिटनेस कसा आहे, याची आपल्याला कल्पना नाही. साहजिकच हार्दिक पंड्यासाठी आयपीएल खूप महत्त्वाची असेल. तो तिथे कशी कामगिरी करतो याकडे सर्वांचे लक्ष असेल, पण यावेळी व्यंकटेश अय्यरने त्याला मागे टाकले आहे. तो सहाव्या क्रमांकावर किती चांगली फलंदाजी करतो, हे पाहून मला आश्चर्य वाटते. आम्ही त्याला सलामीवीर म्हणून पाहिलं आहे, पण त्याने फिनिशरची भूमिकाही उत्तमरित्या पार पाडली आहे. याशिवाय त्याने गोलंदाजीतही बळी घेतले आहेत.

वाचा- कोच द्रविड, तुमच्या बद्दलचा आदर आणखी वाढला; साहाने केलेल्या आरोपावर पाहा काय म्हणालेSource link

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: